अभिनेत्री सुश्मिता सेनचा चाहत्यांना धक्का! ललित मोदींसोबत थाटणार संसार

मुंबई तक

• 02:57 PM • 14 Jul 2022

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे दोघंही लग्न करणार आहेत. याची घोषणा ट्विटर करण्यात आली आहे. सुश्मिता सेनचं मागच्या वर्षी ब्रेक अप झालं होतं. त्यानंतर सुश्मिता सेन ललित मोदींना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशात आता त्यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेचे पत्रकार शिव अरूर यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. सुरूवातीला […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे दोघंही लग्न करणार आहेत. याची घोषणा ट्विटर करण्यात आली आहे. सुश्मिता सेनचं मागच्या वर्षी ब्रेक अप झालं होतं. त्यानंतर सुश्मिता सेन ललित मोदींना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशात आता त्यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेचे पत्रकार शिव अरूर यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. सुरूवातीला या दोघांनी विवाहाची बातमी समोर आली होती. मात्र सध्या आम्ही एकमेकांना डेट करत आहोत हे ललित मोदी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ललित मोदी यांनीही ही घोषणा केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचे आणि सुश्मिता सेनचे फोटोही ट्विट केले आहेत. सुश्मिता सेनचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच रंगल्या होत्या. अशात आता तिने तिच्या चाहत्यांना धक्का देत ललित मोदी यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

आयपीएलचे फाऊंडर ललित मोदी हे विवाहबंधनात अडकणार आहेत. ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्यात प्रेमाचा अध्याय सुरू झाला आहे. ललित मोदींनी सुश्मिता सोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. सुश्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या दोघांनी लग्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत आहोत असं नंतर त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना ओळखत होते. नुकतेच त्यांचं ब्रेकअप झाले आहे. त्यानंतर आता सुश्मिता पुन्हा प्रेमात पडली आहे. सुश्मिता आपल्यापेक्षा लहान वयाच्या रोहमन सोबत रिलेशनशिपमध्ये होती

रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करून देण्यासाठी सुश्मिता सेनचा पुढाकार

सुश्मिताचे या सेलिब्रिटींसोबत होते अफेअर

विक्रम भट्ट : मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (1996) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुश्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

रणदीप हुड्डा : रणदीप हुड्डा सुश्मितासोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.

वसीम अक्रम : 2013 मध्ये सुश्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुश्मिताने हे वृत्त फेटाळून लावले होते.

हृतिक भसीन: 2015 च्या आसपास, सुश्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

मुदस्सर अझीझ: दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुश्मिताशी अफेअर होते. सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता..

    follow whatsapp