मुंबईतील NIA च्या विशेष कोर्टाने सचिन वाझे यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची झालेली हत्या या प्रकरणात NIA ने सचिन वाझेंना अटक केली आहे. गेल्या महिन्याभरापासून वाझे NIA च्या ताब्यात आहेत.
ADVERTISEMENT
वकील अब्बाद पोंडा यांनी सचिन वाझेंची बाजू न्यायालयात मांडली. यावेळी पोंडा यांनी सचिन वाझेंना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात यावं अशी मागणी केली. “जेलमध्ये सचिन वाझे यांच्या जिवाला धोका आहे कारण ते अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये तपास अधिकारी होते. यासाठी त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात यावं. याव्यतिरीक्त आमची कोणतीही मागणी नाही”, असं पोंडा यांनी कोर्टात सांगितलं.
तुम्हाला समजायला हवं ! जेव्हा कोर्ट वाझेंच्या वकीलांना खडसावतं –
तपासयंत्रणांची बाजू मांडणारे वकील सुनील गोन्जालविस यांनी कोर्टासमोर, जेव्हा सचिन वाझे यांनी लिहीलेलं पत्र सादर करण्यात आलं , त्यावेळी कोर्टाने CrPC अंतर्गत योग्य नियमांचं पालन करुन मग हे पत्र कोर्टासमोर सादर करा असं सांगितलं. कोर्टाचे आदेश असूनही वाझेंचं ते पत्र प्रसारमाध्यमांमध्ये लिक करण्यात आलं”, हा मुद्दा मांडला.
ज्यावरुन न्यायालयाने वाझे यांचे वकील पोंडा यांना लगेच खडसावलं. “आम्ही तुम्हाला पत्र कोर्टासमोर मांडू नका असं कधीच सांगितलं नाही. फक्त ते सादर करत असताना CrPC अंतर्गत सर्व नियम पाळले जावेत एवढच स्पष्ट केलं. हा प्रकार पुन्हा व्हायला नको. त्यांना (वाझेंना) याबद्दल माहिती नसेल पण तुम्ही तर त्यांचटे वकील आहात…तुम्हाला प्रकीया काय आहे हे कळायला हवं.” ज्यानंतर वकील पोंडा यांनी न्यायालयाची माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही याची खात्री दिली.
कुठपर्यंत आलाय NIA चा तपास?
स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या NIA ने काही दिवसांपूर्वीच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझेंचे माजी बॉस प्रदीप शर्मा यांची चौकशी केली. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटेलियासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणानंतर सचिन वाझे अशाच प्रकारे एक कारनामा करण्याच्या विचारात होते. सचिन वाझे Anti Terror Act अंतर्गत एक-दोन जणांचा एन्काऊंटर करण्याच्या तयारीत होते.
या प्रकरणात परमबीर सिंग यांचं जबाब हा संशयीत म्हणून नाही तर साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचा रोल आहे का? निवृत्तीनंतरही ते या प्रकरणात सहभागी होते का, या प्रकरणात स्फोटकं किंवा मनसुखच्या हत्येप्रकरणी त्यांनी काही मदत केली का? या दृष्टीकोनातूनही NIA तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ADVERTISEMENT