ADVERTISEMENT
स्वरा भास्कर तिच्या सरप्राईझिंग लग्नामुळे सध्या चर्चेत आलीये.
स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद झिरार अहमदसोबत लग्नाची गाठ बांधलीये.
दोघांनी 6 जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं. स्वराने एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली.
आता या दोघांच्या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो समोर आले आहे. ज्यामध्ये ती संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे.
या पार्टीत सर्व जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्वजण आनंदी दिसत होते.
लुकबद्दल बोलायचे झाले तर स्वराने पांढऱ्या जरदोसी ब्लाउजवर मरून साडी नेसली होती.
स्वराने हातावर मेहंदी, मोत्यांची ज्वेलेरी, मांग टिकासह लूक पूर्ण केला.
स्वरा आणि फहादच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि दिव्या दत्ताही सहभागी झाल्या होत्या.
दिव्याने तपकिरी रंगाचा चिकनकरी सूट घातला होता, ज्यामध्ये तिने ब्लॉक हील्स घातल्या होत्या.
सोनम कपूरने पांढरा सूट आणि लाल रंगाचा हेवी वर्क दुपट्टा परिधान केला होता. त्यासोबत सोनेरी कोल्हापुरी चपल घातली होत्या.
फॅशन डिझायनर अबू जानी देखील सेलिब्रेशन पार्टीत दिसले.
ADVERTISEMENT