Tarak Mehata ka Olta Chashma : जेठालालचा टप्पू करतोय बबिताजींना डेट, सोशल मीडियावर मिम्सना उधाण

तारक मेहता का उलटा चष्मा हा सध्या टेलिव्हीजनवरचा सर्वाधिक काळ सुरु असलेला कार्यक्रम आहे. वर्षानुवर्ष चाहत्यांच्या मनात घर केलेल्या या कार्यक्रमाने आपली घौडदौड कायम सुरु ठेवली आहे. जेठालाल, टप्पू, दयाबेन, बाबुजी, बबिता, अय्यर, पत्रकार पोपटलाल, सोधी, भिडे अशा एक ना अनेक पात्रांनी ही मालिका प्रत्येक घराघरात पोहचली आहे. परंतू प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांनुसार […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:13 AM • 09 Sep 2021

follow google news

तारक मेहता का उलटा चष्मा हा सध्या टेलिव्हीजनवरचा सर्वाधिक काळ सुरु असलेला कार्यक्रम आहे. वर्षानुवर्ष चाहत्यांच्या मनात घर केलेल्या या कार्यक्रमाने आपली घौडदौड कायम सुरु ठेवली आहे. जेठालाल, टप्पू, दयाबेन, बाबुजी, बबिता, अय्यर, पत्रकार पोपटलाल, सोधी, भिडे अशा एक ना अनेक पात्रांनी ही मालिका प्रत्येक घराघरात पोहचली आहे.

हे वाचलं का?

परंतू प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांनुसार टप्पूची भूमिका करणारा राज अनाडकट आणि बबिताची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता डेट करत असल्याचं समोर येतंय. मुनमुन हे राज अनाडकटपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे. पण तरीही गेल्या वर्षभरापासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु असल्याचं कळतंय.

ET Times ने दिलेल्या वृत्तानुसार, तारक मेहताच्या सेटवरही आता सर्वांना राज आणि मुनमुन यांच्या प्रेमप्रकरणाविषयी माहिती आहे. मध्यंतरी मुनमुने या शो मधून ब्रेक घेतला होता आणि ती आता परत शुटींगसाठी यायला लागली आहे. केवळ सेटवरच नव्हे तर त्यांच्या परिवारालाही याबद्दलची माहिती असल्याचं समजतंय. सेटवरही त्यांना कोणीची चिडवत नाही आणि ते देखील आपल्या प्रेमाबद्दल बोलायला मागेपुढे पाहत नसल्याचं कळतंय.

दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मिम्सचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मुनमुन अडचणीत आली होती. आता मुनमुन आणि राज आपल्या नात्याबद्दल नेमकं काय आणि कधी जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हाय मेरी परमसुंदरी! सोनालीच्या बिकीनी लूक ची सर्वत्र चर्चा

    follow whatsapp