अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास ६ वर्षांचा सश्रम कारावास

मुंबई तक

• 09:17 AM • 04 Mar 2022

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकास न्यायालयाने ६ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून दंडाची रक्कम न भरल्यास हा कारावास दोन वर्षांनी वाढवला जाणार आहे. अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी हा निर्णय दिला. १४ सप्टेंबर २०१७ रोजी अकोट पोलीस ठाण्यात पीडित […]

Mumbaitak
follow google news

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकास न्यायालयाने ६ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून दंडाची रक्कम न भरल्यास हा कारावास दोन वर्षांनी वाढवला जाणार आहे. अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी हा निर्णय दिला.

हे वाचलं का?

१४ सप्टेंबर २०१७ रोजी अकोट पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. यावेळी आरोपी शिक्षक जयंत वावगेने आपल्या मुलीवर शाळेत शारिरिक अत्याचार केल्याचं तिच्या आईने तक्रारीत म्हटलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात खटला दाखल केला.

सत्र न्यायालयाने या खटल्यात १० साक्षीदार तपासले. यानंतर पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि त्यांचा तपास ग्राह्य धरत आरोपी शिक्षकाला दोषी ठरवत ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

संशयातून टोकाचं पाऊल! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतःच्या गळ्यावरून फिरवलं धारदार शस्त्र

    follow whatsapp