मुंबईत PUBG खेळण्यासाठी 16 वर्षांच्या मुलाने आईच्या बँक खात्यातून खर्च केले 10 लाख

मुंबई तक

• 07:20 AM • 28 Aug 2021

सध्याची पिढी मोबईलवर खेळण्यात गुंतलेली असते. लॉकडाऊन असल्याने मोबाईल हेच लहानग्याचं विश्व झालंय असंच म्हणता येईल. अशात 16 वर्षांच्या एका मुलाने PUBG हा गेम खेळण्यासाठी आई वडिलांच्या अकाऊंटमधून 10 लाख रूपये काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. Online Gaming सेशन्ससाठी त्याने दहा लाख रूपये काढले. आई वडिलांना जेव्हा आपल्या खात्यातून दहा लाख रूपये गेल्याचं कळलं तेव्हा […]

Mumbaitak
follow google news

सध्याची पिढी मोबईलवर खेळण्यात गुंतलेली असते. लॉकडाऊन असल्याने मोबाईल हेच लहानग्याचं विश्व झालंय असंच म्हणता येईल. अशात 16 वर्षांच्या एका मुलाने PUBG हा गेम खेळण्यासाठी आई वडिलांच्या अकाऊंटमधून 10 लाख रूपये काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. Online Gaming सेशन्ससाठी त्याने दहा लाख रूपये काढले. आई वडिलांना जेव्हा आपल्या खात्यातून दहा लाख रूपये गेल्याचं कळलं तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली ज्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे.

हे वाचलं का?

या अल्पवयीन मुलाने पबजीसाठी ऑनलाइन व्यवहाराद्वारे आपल्या आईच्या अकाऊंटमधून चक्क 10 लाख रुपये खर्च केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आई-वडिलांनी फटकारल्यानंतर हा मुलगा जोगेश्वरी परिसरातील आपल्या घरातून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी (२७ ऑगस्ट) याबाबत माहिती देताना सांगितलं की, मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पोलिसांनी गुरुवारी (२६ ऑगस्ट) दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे पाठवलं आहे.

या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेली. 26 तारखेल्या त्याच्या काही मित्रांकडून त्यांनी माहिती मिळवली. सीसीटीव्ही फुटेजही तपासलं ज्यानंतर हा मुलगा महाकाली केव्ह्ज या ठिकाणी असलेल्या त्याच्या घरापासून काही अंतरावर पळाला असल्याचं कळलं.

बुधवारी (२५ ऑगस्ट) संध्याकाळी मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. मुलाच्या वडिलांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं की, ‘माझ्या मुलाला गेल्या काही महिन्यांपासून पबजीचं अक्षरशः व्यसन लागलं होतं. यावेळी त्याने मोबाईलवर खेळताना आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च केले.’ तर पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जेव्हा या मुलाच्या आई-वडिलांना या ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्याला चांगलंच खडसावलं. तसंच पोलिसांना जेव्हा हा सगळा प्रकार समजला तेव्हा पोलिसांनीही त्याचं समुपदेशन केलं.

याआधीही ब्लू व्हेल या गेममध्ये अडकून काही मुलांनी आत्महत्या केली होती. मुंबईतही अशा काही घटना घडल्या होत्या. आता पबजी खेळण्यासाठी अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून दहा लाख रूपये खर्च केल्याची घटना समोर आली आहे.

    follow whatsapp