बायकोचा मटण बनवायला नकार, पठ्ठ्याने थेट पोलिसांनाच फोन लावला आणि मग…

मुंबई तक

• 08:20 AM • 21 Mar 2022

अनेकदा नवरा-बायकोमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होताना आपण पाहिलं आहे. अनेकदा या क्षुल्लक वादातून नवरा-बायको पोलीस स्टेशन गाठतात. तेलंगणातील एका नवरोबाने तर कमालच केली आहे. बायकोने रात्रीच्या जेवणात आपली आवडती मटणची डीश न बनवल्यामुळे या पठ्ठ्याने थेट १०० नंबरवर पोलिसांना फोन करत बायकोची तक्रार करायला सुरुवात केली. नालगोंडा पोलिसांनी या प्रकारासाठी फोन करुन तक्रार करणारा पती […]

Mumbaitak
follow google news

अनेकदा नवरा-बायकोमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होताना आपण पाहिलं आहे. अनेकदा या क्षुल्लक वादातून नवरा-बायको पोलीस स्टेशन गाठतात. तेलंगणातील एका नवरोबाने तर कमालच केली आहे. बायकोने रात्रीच्या जेवणात आपली आवडती मटणची डीश न बनवल्यामुळे या पठ्ठ्याने थेट १०० नंबरवर पोलिसांना फोन करत बायकोची तक्रार करायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

नालगोंडा पोलिसांनी या प्रकारासाठी फोन करुन तक्रार करणारा पती नवीनलाच अटक केली आहे. हा प्रकार १८ मार्चला घडला आहे. घरी गेल्यावर नवीनला जेव्हा बायकोने मटण केलेलं नसल्याचं कळलं तेव्हा त्याला राग आला आणि त्याने १०० नंबरवर पोलिसांना फोन करुन बायकोची तक्रार केली.

नवीनने सुरुवातीला जेव्हा पोलीस कंट्रोल रुमला फोन केला तेव्हा ऑपरेटरला कोणीतरी दारु पिऊन फोन करत असल्याचं वाटलं. परंतू यानंतर नवीनने सलग सहा वेळा फोन करुन याच कारणासाठी फोन केल्यामुळे ऑपरेटरने वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी नवीनला अटक केली आहे.

    follow whatsapp