ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची एक चोरांनी लांबवली. पण या घटनेमध्ये तब्बल 1.68 कोटी रुपयांचे दागिने चोरल्याचं समोर आलं आहे. तसंच या बॅगमध्ये काही रोख रक्कमही होती. शनिवारी पहाटे 1:30 वाजता उंबरमाळी गावाजवळ ही घटना घडली. तपास सुरू केला असून, लवकरच चोरांना पकडलं जाईल असं पोलीस म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Amit Shah : "शरद पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम...", अमित शाहांचं विरोधकांवर शरसंधान
कसारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर-पूर्वमधील रहिवासी असलेले ज्वेलर्स किरण कुमार पुरोहित हे त्यांच्या व्यवसायाच्या कामावरुन परतत होते. ते अहिल्यानगर जिल्ह्यातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणत होते. बॅग सीटवर ठेवून ते पाणी खरेदी करण्यासाठी बसमधून खाली उतरले, तेव्हा चार चोरट्यांनी त्यांची बॅग चोरली.
हे ही वाचा >> Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये 5 जण जागीच ठार, जखमींमध्ये...
चोरी केल्यानंतर आरोपी कारने मुंबईच्या दिशेने पळून गेले. बस चालकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरांना पकडता आलं नाही कारण त्यांच्या गाडीचा वेग हा जास्त होता. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माध्यमांच्या मदतीने तपास सुरू केला आहे. कसारा पोलिसांनी या प्रकरणी चोरी आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गावित म्हणाले की, ही चोरीची घटना प्लॅन करुन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संशयितांना शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक मोठे प्रयत्न करत आहे.
ADVERTISEMENT
