आज ईडीचे काही अधिकारी चौकशीसाठी आले होते. त्यांना मी पूर्ण सहकार्य केलं आहे. पुढील काळातही सहकार्य करणार आहे. परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले होते. त्यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यांची जी संशयास्पद भूमिका होती त्यामुळे आम्ही त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवलं होतं. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी आयुक्त असतानाच आरोप करायला हवे होते अशी प्रतिक्रिया आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घरासमोर स्कॉर्पिओ आणि त्यामध्ये ज्या जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या. मनसुख हिरेनची जी हत्या करण्यात आली त्यामध्ये पोलीस आयुक्तालयाचे जे एपीआय होते सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, सुनील माने असे जे पोलीस अधिकारी होते. CIU डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. हे सगळे अधिकारी परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होते. त्यामुळे जेव्हा शासनाला हे समजलं की हे सगळेजण या प्रकरणात आहेत हे सगळेजण परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. त्यामुळे परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. हे सगळे अधिकारी तुरुंगात आहेत. परमबीर यांच्या संशयास्पद भूमिका होती म्हणूनच त्यांना पदावरून हटवलं गेलं. ज्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआय आता चौकशी करतं आहे जनतेसमोर सत्य लवकरच येईल असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज सकाळी ईडी ने छापेमारी केली. सकाळी 8 वाजल्यापासून ईडीचं 5 ते 6 जणांचं पथक अनिल देशमुख यांच्या घराची झा़डाझडती घेतली जात आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील सिव्हील लाईन्स येथील राहत्या घरी आज ईडीने ही कारवाई केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. नागपूर व्यतिरीक्त अनिल देशमुखांच्या मुंबई येथील निवासस्थानी देखील ईडीने छापेमारी केल्यामुळे देशमुखांसमोरील अडणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील मलबार हिल आणि वरळी या दोन घरांवर ईडीने छापे मारले.
केंद्रीय यंत्रणांच्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई, आम्हाला चिंता नाही-शरद पवार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर अनिल देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. याच प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या घरावर छापेमारी केल्याचं कळतंय. सकाळी ८ वाजल्यापासून ईडीचं पथक देशमुखांच्या घराची झाडाझडती घेत होते. आता ती संपली आहे. यानंतर माध्यमांसमोर येऊन अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांना स्वीय सचिवाला ईडीने ताब्यात घेतलं आहे त्याबाबत देशमुख यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
ADVERTISEMENT