समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. जर नवाब मलिक यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे. अशा प्रकारे समीर वानखेडे यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी आवश्यकता नाही. नवाब मलिक यांचे व्यक्तीगत फोटो व्हायरल केले जात आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे. आज मला ज्ञानेश्वर वानखेडे आणि क्रांती रेडकर हे दोघेही भेटले त्यांनी मला जातीचे सगळे पुरावे दाखवले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. आम्ही समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले रामदास आठवले?
आज क्रांती रेडकर म्हणजेच समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर या दोघांनीही माझी भेट घेतली. या दोघांनीही मला त्यांची जातीची प्रमाणपत्रं दाखवली आहेत. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी धर्म परिवर्तन केलेलं नाही. त्यांचं लग्न एका मुस्लिम महिलेशी झालं होतं. मात्र त्यांनी धर्म बदलला नव्हता. परस्पर सहमतीने हे लग्न झालं होतं. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं असंही आठवले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर समाज म्हणून आम्ही क्रांती रेडकर, समीर वानखेडे आणि ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या पाठिशी उभे आहोत. त्यांनी जातीचा गैरफायदा घेऊन कुठलंही खोटं प्रमाणपत्र तयार केलेलं नाही असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम’ नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं उत्तर
नवाब मलिक यांनी काय म्हटलं आहे?
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला की समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.
वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली. फेसबूकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT