भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली कार, मग चर्चा तर होणारच!

मुंबई तक

• 10:23 AM • 14 Oct 2021

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेली कार नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. उदयनराजे भोसले यांनी नवी कोरी कार घेतली आणि त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. तो फोटो लगेचच व्हायरल झाला आहे. आज उदयनराजे भोसले यांनी BMW ही कार घेतली. पुण्यातून त्यांनी ही कार घेतली. BMW कंपनीची TEX 5 ही कार उदयनराजेंनी विकत घेतली. पुण्यातल्या बवेरियन […]

Mumbaitak
follow google news

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेली कार नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. उदयनराजे भोसले यांनी नवी कोरी कार घेतली आणि त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. तो फोटो लगेचच व्हायरल झाला आहे. आज उदयनराजे भोसले यांनी BMW ही कार घेतली. पुण्यातून त्यांनी ही कार घेतली. BMW कंपनीची TEX 5 ही कार उदयनराजेंनी विकत घेतली.

हे वाचलं का?

पुण्यातल्या बवेरियन मोटर्स प्रा. लि. या ठिकाणाहून TEX 5 ही कार विकत घेतली. या कारचा नंबरही 007 असा आहे. या कारचा नंबर MH 11 DD 007 असा आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे. त्यांनी नव्या कारसोबतचा हा फोटो उदयनराजेंनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो लगेच व्हायरलही झाला आहे.

उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंझ, एंडेव्हर, मारूती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. त्यात आता BMW कारची भर पडली आहे. त्यांच्या पत्नी दमंयतीराजे यांच्याकडे पोलो ही कार आहे.

बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवी कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे. त्यांनी नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये असून त्यांनी या ही कारला एमएच 11 डी डी 007 हा त्यांचा सध्या सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल झाले असून महाराजांची ही अलिशान नवीन गाडी साताऱ्यात कधी येणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.

उदयनराजेंची तरुणाईत खूप क्रेझ आहे. सोशल मीडियावर तर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यांच्या स्टाईलची अनेकजण कॉपीही करतात. त्यांची पत्रकार परिषदेत कॉलर उडवून दाखवणारी स्टाईलही खूप गाजली होती. साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक जेव्हा नवीन कार विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. अनेक वेळा स्वतः उदयनराजेंनी त्याची रायडिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

काही आठवड्यांपूर्वी उदयनराजेंनी एका कारमधून फेरफटका मारला होता. त्याचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. कारमधून जेव्हा उदयनराजे बाहेर पडले तेव्हा तिथे हजर असलेले लोक हे त्यांच्या पायाही पडले होते.

    follow whatsapp