शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहणार असं सांगितलं आहे. पक्ष चिन्हाबाबत कुणीही चिंता करू नका. ते आपल्याकडेच राहणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
एक चर्चा चालली आहे ती म्हणजे चिन्हावर. धनुष्यबाण कुणाकडे जाणार? धनुष्यबाण शिवसेनेकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर धनुष्यबाण हे चिन्ह आहे. ते आपलंच चिन्ह आहे ते आपलंच चिन्ह राहणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नुसतं चिन्हच लोक बघत नाहीत धनुष्यबाण हाती घेणाऱ्याची चिन्हंही लोक पाहतात. याची चिन्हं बरी आहेत का? लक्षणं बरी आहेत का हे देखील लोक पाहातात असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कुणीही चोरून नेऊ शकेल अशी काही शिवसेना नाही. रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत असतो. जनता नंतर त्यांना निवडून देते. एक आमदार असलेला पक्ष आहे असं समजा तो निघून गेला की पक्ष संपला का? तर तसं होत नाही. पक्ष संपत नाही. विधीमंडळ पक्ष वेगळा आणि रजिस्टर्ड पार्टी वेगळी असते असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचाच राहिल हे घटना तज्ज्ञांनी बोलून मी आपल्या सगळ्यांना सांगतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
काय वाट्टेल ते होऊ दे आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं माझ्यासोबत असलेल्या १५-१६ आमदारांनी मला सांगितलं आहे. त्यांच्या धीराचं मला कौतुक आहे. आपल्याकडे अजूनही असत्यमेव जयते असं म्हणत नाहीत. सत्यमेव जयते म्हणतात. माझा न्यायालयावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आषाढीच्या दिवशी विठोबाचं दर्शन घ्यायला अनेक जण जाणार आहे. मलाही वारकऱ्यांचे निरोप आले की तुम्हीही दर्शनाला या. मात्र मी या सगळ्या गदारोळात जाणार नाही. मी नंतर जाईन. मी आज सकाळच्या वेळी थोडं शांत राहिलो. मागच्या आठ-दहा-पंधरा दिवस सामान्य लोकांचे लोंढे येत आहेत. लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला कायमच आठवतं ते म्हणाले होते माशाच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत. तसंच मला दुःख झालं आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मला जो त्रास झाला तो कुणालाही झाला नसेल. कारण कोव्हिड झाल्यानंतर बरं होतानाच हा सगळा त्रास झाला. साधी माणसं शिवसेनेने मोठी केली. ज्यांना साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं त्यांनी शिवसेना सोडली. पण जोपर्यंत शिवसेनेत ही साधी माणसं आहेत तोपर्यंत शिवसेना आहे. शिवसेना ही कुणाची हा प्रश्न समोर येतो. पण शिवसेना ही काही गोष्ट नाही की कुणीही घेतली आणि पळत सुटला. शिवसेना कुणी चोरू शकत नाही. विधीमंडळ पक्ष आणि बोली भाषेत रस्त्यावरचा पक्ष हा पक्ष जनतेसाठी रस्त्यावर उतरत असतो.
ADVERTISEMENT