Aditya Thackeray : “शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं सरकार लवकरच कोसळणार”

मुंबई तक

07 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:38 AM)

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत सरकारकडून मिळालेली नाही . राज्यभरातील या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे धीर देत आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं आश्वस्त करत आहेत . आदित्य ठाकरे यांच्या ‘शेतकरी संवाद’ यात्रेची आज अकोल्यातून सुरुवात झाली आहे . अकोला, […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत सरकारकडून मिळालेली नाही . राज्यभरातील या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे धीर देत आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं आश्वस्त करत आहेत . आदित्य ठाकरे यांच्या ‘शेतकरी संवाद’ यात्रेची आज अकोल्यातून सुरुवात झाली आहे . अकोला, बुलढाणा आणि संभाजी नगर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत .

हे वाचलं का?

राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना उघड्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध करत , आदित्य ठाकरे यांनी ४० आमदारांना आव्हान दिलंय . सरकार म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाकी करा . तसंच तुम्हाला जनतेने गद्दार म्हणून नाही , राज्यकर्ते म्हणून स्वीकारलं असेल, तर तुम्हाला चेलेंज देतो,, मी राजीनामा देतो,, तुम्ही ४० जण राजीनामा देऊन निवडणुका घ्या,, बघुयात जनतेचा कौल काय आहे . हे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील फुटीर आमदारांना दिलंय .

अकोल्यात झालेल्या संवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानत . शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा सन्मान केला . यावेळी बोलताना “एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या बांधावर जात असलो, तरी आज ही सभा नितीनजींसाठी आहे,, आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते लढतायत . ज्यांनी स्वतःला विकल नाही, मान सन्मान विकलं नाही, अश्या व्यक्तीला मिठी मारायला आलोय , हे प्रेम आणि हा विश्वास असतो” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नितीन देशमुख यांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलंय . तसंच योगा योगाने डावीकडे आणि उजवीकडे निष्ठावान शिवसैनिक आहेत, आदर्श शिवसैनिक आहेत असं म्हणत २०१९ मध्ये महाविकास आघाडी बनत असताना , भाजप सोबत युती मोडत असताना, उद्धव साहेबांचा फोन यायच्या आधी प्रधानमंत्री कार्यालयात पदाचा राजीनामा देऊन मुंबईकडे यायला निघालेल्या अरविंद सावंत यांच् देखील आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलंय .

अकोल्यातील संवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी बोलताना “आम्ही नजरेत नजर घालून सांगू शकतो,, आमच्या मनात मान, सन्मान, प्रेम निष्ठा आहे, दुसऱ्या बाजूला ४० गद्दार लोक, पळून गेले आहेत , तुम्ही कोणाच्या सोबत आहात ? असा सवाल उपस्थित जनतेला करत रणरणत्या उनात तुमचं प्रेम खरं नसत तर आला नसता, पण तुम्ही प्रेम द्यायला आलाय म्हणत आदित्य ठाकरेंनी त्यांचे आभार मानलेत .

यावेळी राज्यातून बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय . “महाराष्ट्रात एवढं विचित्र वातावरण आहे, उद्योग राज्यातून पळून जातायत, शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही , वर खरं मुख्यमंत्री कोण आपल्याला माहिती नाही , गदारांचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरतायत” असं म्हणत सरकारवर घणाघात केलाय

    follow whatsapp