राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. त्यांनी पुण्यात या सभेबद्दलची घोषणा केली होती. मुंबई, ठाण्यानंतर राज यांनी थेट औरंगाबादची निवड केल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. औरंगाबाद किंवा ते म्हणतात त्याप्रमाणे संभाजी नगरच का निवडलं? त्याचं एक कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेबांनी १९८८ मध्ये औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर मराठवाड्यातील पहिली सभा घेतली होती. आता याच मैदानावर राज ठाकरे सभा घेत आहेत. इथेच सभा घेण्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी केलेलं विश्लेषण…
ADVERTISEMENT
“राज ठाकरे यांनी औरंगाबाद निवडण्याचं कारण हिंदुत्वाचा व्यापक मुद्दा त्यांना आता देशभर घेऊन जायचा असावा आहे तोच हेतू आहे. औरंगाबाद आणि शिवसेनेचं नातं हे १९८७ पासून खूप घट्ट झालं आहे. १९८७ ला त्यांनी पहिली शाखा सुरू केली. त्यापाठोपाठ दोन दंगलीही घडवून आणल्या. १९८८ ला महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा परिस्थिती अशी होती की ८० जागांसाठी शिवसेनेकडे उमेदवारही नव्हते. ६० जागा त्यावेळी शिवसेनेने लढवल्या होत्या. त्याचा मुद्दा हिंदुत्व होतंच पण मुस्लिम विरोध हा प्रमुख मुद्दा होता.”
Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे
”१९८८ च्या पूर्वी औरंगाबादचं नेतृत्व हे एकजात मुस्लिम होतं. दादामिया, दस्तगीर अशी किती तरी नावं सांगता येतील. अमनउल्ला मोतीवाले आमदार झाले. डॉ. रफिक झकेरिया हे सेक्युलर म्हणून ओळखले जातात. या सगळ्यांची जबरदस्त पकड औरंगाबादवर होती. ते तोडण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. औरंगाबादमध्ये किंबहुना मराठवाड्यात अशी प्रथा आहे की मशिदीवरून जेव्हा मिरवणुका किंवा वराती काढल्या जातात तेव्हा त्या शांत असतात. ही प्रथा १९८८ ला शिवसेनेने मोडली. एका मुस्लिम खाटीक खान्याची दंगल होती ती सगळ्या औरंगाबादला माहित आहे. विलास भानुशाली म्हणून नगरसेवक होते त्यांच्याकडे या सगळ्याचं नेतृत्व होतं. त्यावेळी आठवडाभर मुस्लिम आणि हिंदू वस्त्यांमध्ये घंटानाद आणि शंखनाद शिवसेनेने केला होता. हे औरंगाबादकरांना नवीन होतं.”
“लांडा हा अपशब्दही बाळासाहेब ठाकरेंनी तिथे वापरला होता. मुस्लिमांचा वर्चस्ववाद होता त्याला हैदराबाद मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी आहे. मराठवाड्यातल्या जनतेने त्याला जातीय रंग दिला नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जी १९८८ मध्ये दोन ऐतिहासिक सभा घेतली होती. एक सभा निवडणुकीच्या आधी घेतली गेली. दुसरी सभा निवडणुकीच्या नंतर विजयी सभा घेतली गेली. १९८८ च्या सभेत बाळासाहेबांनी औऱंगबाद करांना साष्टांग दंडवत घातला होता. हे पहिल्यांदा घडलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी त्याचवेळी सांगितलं की मी इथल्या औरंगजेबाचा सूड घेणार. त्यामुळेच त्यांनी संभाजीनगर असं औरंगाबादला म्हणण्यास सुरूवात केली.”
सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे-राज ठाकरे
“राज ठाकरेंनी भोंगा हे एक निमित्त केलं आहे. भोंग्याच्या विरोधात कायदा विरूद्धच आहे. सर्वसामान्यांनाही भूमिका घ्यावी लागणारच आहे. औरंगाबादला येऊन ते १०० टक्के ते संभाजीनगरचा मुद्दा काढतील. २०१९ लाही ते आले होते तेव्हाही त्यांनी नामांतराचा मुद्दा बाहेर काढला होता. कोरोना आल्याने निवडणुका पुढे गेल्या. संभाजीनगरच नाही तर हैदराबाद मुक्तीसंग्रमांत मुस्लिमांनी अत्याचार केले आहेत. त्याचे संदर्भही सगळ्याना माहित आहेत. राज ठाकरे हे उघडपणे मुस्लिमविरोधी भूमिका घेत आहेत. कारण ती भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही अडचणीची आहे. हा प्रश्न वाढवायचा आणि गंमत बघायची. ईदच्या आदल्या दिवशी सभा आहे. सभेवर बंदी घातली गेली तर राज ठाकरे मोठे होतील. ते सरकार होऊ देणार नाही.”
“औरंगाबादमध्ये ५२ टक्के मुस्लिम आहेत. २० टक्के दलित समाज आहे. त्यांच्यात अस्वस्थता निर्माण करणं आणि संधीची वाट पाहून दोन दगड जरी पडले तरीही त्याचे परिणाम महाराष्ट्रात बघायला मिळतील. औरंगाबादमध्ये एकदा परिणाम झाला की मराठवाड्यात त्याचे पडसाद उमटतात.”
“औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव निवडून आले होते पण नंतर त्यांनी पक्ष बदलला. राज ठाकरे यांनी जे हनुमान चालीसा म्हणण्याचं आवाहन केलं होतं त्यात इथे १८० लोकही नव्हते. आता जी सभा इथे होणार आहे ती सभा कशी होते? त्याला पैसे कोण देणार? कार्यकर्ते कुठून येणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.”
ADVERTISEMENT