एकीकडे भारतात मोठ-मोठे हायवे, फ्लायओव्हर बनत आहेत. मोठमोठ्या प्रकल्पाची घोषणा केली जात आहे. मात्र, भारताच्या ग्रामीण भागात अजूनही भौतिक सुविधा पोहचल्या नसल्याचे पुरावे वारंवार बातम्याच्या माध्यामाने समोर येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक खेड्यात अजूनही स्मशानभूमी नसल्याने पारंपारीक पद्धतीने अंत्यविधी देखील करु शकत नाही, अशीच परिस्थिती आहे.
ADVERTISEMENT
स्मशानभूमी नसल्याने ग्र.पं समोर अंत्यसंस्कार करण्य़ाचा निर्णय
कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी या गावात असाच प्रकार पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून फडतरवाडी गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करायचा कुठे? असा प्रश्न नेहमी गावकऱ्यांसमोर पडलेला असतो. त्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यास अढचणी येत होत्या.
त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क ग्रामपंचायतच्या समोरच सरण रचले आणि याच ठिकाणी अंत्यसंस्कार करणार असल्याचा निर्णय घेतला. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात येऊन गावकऱ्यांना शांत केले. गावकऱ्यांना शांत करत तहसीलदारांनी गावातीलच एक जागा स्मशानभूमीसाठी पर्यायी म्हणून देणार असल्याचे कबूल केल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले.
उस्मानाबादमध्येही ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार
उस्मानाबाद जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. गावात स्माशानभूमी असूनही त्याचा वाद असल्याने संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरचं मृतदेहाला मुखाग्णी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे ही घटना घडली आहे. मालु लिंगा दुधभाते यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 80 वर्षी निधन झाले होते.
पण गावातील समशान भूमीचा वाद 2016 पासून सुरू आहे तो अद्याप मिटलेला नाही. प्रत्येकी वेळी पोलीस संरक्षण घेऊन अंतविधी केला जात होता. यावेळी मात्र अंत्यविधी पारंपरिक समशान भूमीतच करू दया, ही भूमिका नातेवाईकांनी घेतली. यात तोडगा निघत नसल्याने शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा अंत्यविधी करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अशा अनेक घटनांमुळे महाराष्ट्रातील विदारक चित्र समोर येत आहे. अनेक गावाला पूर आल्याने रुग्णांना नेताना अढचणीचा सामना करावा लागत आहे. जालना जिल्ह्यातील एका गावात रस्ता वाहून गेल्याने पुराच्या पाण्यातून नेताना वाटेतच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर अनेक गावात स्मशानभूमी आहे पण तिथंपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पावसात नदीतून पार्थिव नेण्याची वेळ येते, अशी विदारक परिस्थिती राज्यातील काही ठिकाणी पहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT