Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरलं, ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय?

मुंबई तक

• 04:26 PM • 10 Jun 2021

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international Airport) दिवंगत नेते दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी सातत्याने होत आहेत. त्यासाठी आज (10 जून) ठाणे-बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी अभिनव आंदोलन केलं होतं. मात्र, या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचंच नाव दिलं जाणार असल्याचं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international Airport) दिवंगत नेते दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी सातत्याने होत आहेत. त्यासाठी आज (10 जून) ठाणे-बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी अभिनव आंदोलन केलं होतं. मात्र, या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचंच नाव दिलं जाणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.

हे वाचलं का?

याबाबतची माहिती स्वत: राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईतील संघर्ष समिती नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव’

‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तशा प्रकारचा ठराव सिडकोने केलेला आहे. बाळासाहेबांचं योगदान हे राज्याला नव्हे तर देशाला लाभलं होतं. त्यामुळे या विमानतळाला त्यांचं नाव दिलेलं आहे. यापूर्वी यामध्ये कुठलंही नामकरण किंबहुना ठराव दि. बा. पाटील यांच्या नावाचा झाला नव्हता.

दि. बा. पाटील यांचा आम्ही आदरच करतो. नक्कीच त्यांनी भूमिपूत्रांसाठी आणि साडेबारा टक्के योजनेसाठी त्यांनी संघर्ष केला. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत संघर्ष समितीची काल बैठक देखील झालेली आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं आहे की दि. बा. पाटील यांच्याबाबत आम्हाला खूप आदर आहे. म्हणून दोन्ही नेते आहेत ते मोठे नेते आहेत. बाळासाहेबांच्या नावाला कुणाचा आक्षेप असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हे सामोपचाराने झालं पाहिजे यामध्ये वादविवाद होता कामा नये.’

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन भाजप-शिवसेना आमनेसामने… नेमकं प्रकरण काय?

‘तर आणखी जे काही मोठे प्रकल्प आहेत त्यांना आपण दि. बा. पाटील यांचं नाव सुचवा. त्या प्रकल्पांना आपण जे काही सुचवाल त्याप्रमाणे सरकारच्या वतीने निर्णय घेतला जाईल.’

‘सरकारची देखील हीच भूमिका आहे की, बाळासाहेबांचं नाव विमानतळाला दिलेलं आहे. पूर्वी जर कुणाचं नाव दिलेलं असतं आणि ते नाव काढून जर आम्ही बाळासाहेबांचं नाव दिलं असतं तर ते योग्य नव्हतं.’

महाराष्ट्राची प्रत्येक पायरीवर कोंडी करायची असा जणू विडाच दिल्लीने उचललेला दिसतो: शिवसेना

‘आता देखील दि. बा. पाटील यांचा आम्ही आदर करतो. त्या समितीच्या लोकांनी इतर प्रकल्पासाठी नाव सुचवावं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे. एक बैठक झालेली आहे दुसरी बैठक होणार आहे. त्यामधून सकारात्मक निर्णय लागेल.’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्यात येईल.

नवी मुंबईत अनोखं आंदोलन…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण केंद्रीय कृती समिती आणि नवी मुंबई शहरातील समितीने आंदोलनाची हाक दिल्यावर भूमिपुत्रांनी हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला होता. नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापूर येथे मुख्य रस्त्यावर पारंपरिक वेशभूषा परिधान करून आंदोलक रस्त्यावर मानवी साखळी उभारून सरकारचा निषेध करत होते.

सुमारे तीन तास निषेधाचे फलक हाती घेवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दि. बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे ही मागणी करण्यात आली.

येत्या 24 जून रोजी सिडको मुख्यालयास घेराव घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनाचे पडसाद शेजारच्या रायगड ग्रामीण व ठाणे ग्रामीण भागात देखील उमटल्याने स्थानिक भूमिपुत्र या चळवळीत सहभागी होत आहेत.

    follow whatsapp