आपल्याला सर्दी, खोकला(Cough, Cold) किंवा ताप (Fever) आला तर आपण डॉक्टरांकडे जातो. सर्दी, खोकला झाला तरीही कोरोनानंतर (Corona) आपण स्वतःची थोडी जास्तच काळजी घेत आहोत. अशात कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एक घटना घडली. ही घटना पाहून आणि ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि डॉक्टरांचं कौतुकही वाटेल. कोल्हापूरमधल्या एका क्लिनिकमध्ये डॉक्टरसमोर (Doctor) एक रूग्ण बसला होता. त्याला बसल्या बसल्याच हार्ट अटॅक (Heart Attack)आला. त्याचा जीव डॉक्टरांनी वाचवला.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे हेलिकॉप्टर भेळ, तुम्ही पाहिलात का व्हीडिओ?
डॉक्टरांनी या घटनेनंतर नेमकं काय केलं?
रूग्णाला हार्टअटॅक येतो (Patient Had Heart Attack) आहे हे डॉक्टरांना लगेचच लक्षात आलं. ज्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्याच्या जवळ धाव घेतली आणि त्याचे प्राण वाचवले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Viral Video on Social Media )
काय आहे या व्हायरल व्हीडिओत?
कोल्हापूरमधल्या एका क्लिनिकचा हा व्हीडिओ आहे. हा व्हीडिओ पाहून तुम्ही डॉक्टरांचं कौतुक कराल. कारण या व्हीडिओत एक रूग्ण डॉक्टरांच्या समोर बसलेला दिसतो आहे. डॉक्टर बोलत असतानाच या रूग्णाला खुर्चीवरच हृदयविकाराचा झटका येतो. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे त्या रूग्णाचा जीव वाचला. डॉक्टरांनी वेळीच धाव घेऊन रूग्णावर उपचार केले त्यामुळे या रूग्णाचा जीव वाचला.
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेला ‘हा’ व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
नेमकी कुठे घडली ही घटना?
ही घटना कोल्हापूरचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या रूग्णालयात घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. रूग्ण आणि कुटुंबीय डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच रूग्णाची तब्बेत बिघडली. रूग्ण खुर्चीतून कोसळण्याच्या अवस्थेत आला. अशात डॉक्टरांनी रूग्णाच्या छातीवर हलक्या हाताने मारत त्याचा जीव वाचवला.
व्हीडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की रूग्ण आणि त्याचे कुटुंबीय डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत. रूग्णही खुर्चीवर बसलेला आहे. अशात रूग्णाला अस्वस्थ वाटू लागतं आणि तो खुर्चीवरून कोसळायच्या बेतात असतो. अशात डॉक्टर तातडीने त्याच्या जवळ धाव घेतात आणि त्याचा जीव वाचवतात. रूगणाला मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या या डॉक्टरांचं कौतुक होतं आहे.
ADVERTISEMENT