शेतकरी आंदोलनाला संजीवनी देणारे राकेश टिकैत कोण?

मुंबई तक

• 02:30 PM • 02 Feb 2021

दिल्लीतले शेतकरी आंदोलनात राकेश टिकैत हे आत्ता शेतकरी आंदोलनाचा मुख्य चेहरा म्हणून समोर येत आहे. गाझीपूर बॉर्डरजवळ लाल किल्ल्याच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलक शरणागती स्वीकारणार अशी आवई उठली होती आणि गाझीपूर सीमेवर नोव्हेंबरपासून बसलेले शेतकरी हळूहळू जागा रिकामी करु लागले. पण याचवेळी राकेश टिकैत यांनी आक्रमकपणे पुढे येत आपण शरणागती स्वीकारणार नसल्याचे सांगतिले, पण हे सांगताना […]

Mumbaitak
follow google news

दिल्लीतले शेतकरी आंदोलनात राकेश टिकैत हे आत्ता शेतकरी आंदोलनाचा मुख्य चेहरा म्हणून समोर येत आहे. गाझीपूर बॉर्डरजवळ लाल किल्ल्याच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलक शरणागती स्वीकारणार अशी आवई उठली होती आणि गाझीपूर सीमेवर नोव्हेंबरपासून बसलेले शेतकरी हळूहळू जागा रिकामी करु लागले.

हे वाचलं का?

पण याचवेळी राकेश टिकैत यांनी आक्रमकपणे पुढे येत आपण शरणागती स्वीकारणार नसल्याचे सांगतिले, पण हे सांगताना त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या गाझीपूरमध्ये आंदोलकांची गर्दी वाढू लागली.

शेतकर्यांच्या विस्कळीत होत जाणार्या आंदोलनाला पुन्हा संजीवनी देणारे टिकैत आहेत तरी कोण

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात जे एक नाव सगळीकडे प्रसिध्द झाले आहे ते आहेl भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे.. भारतीय किसान युनियन ही एक देशव्यापी शेतकरी संघटना असून त्यांचे अध्यक्ष राकेश यांचे मोठे बंधू नरेश टिकैत आहेत. पण संघटनेशी संबंधित सर्व निर्णय हे राकेश टिकैत हेच घेतात.

सरकारशी शेतकऱ्यांशी जी चर्चा केली त्यात राकेश टिकैत हे प्रमुख ऩेते होते. राकेश टिकैत यांनी गृहमंत्री अमित शहांशी सुध्दा चर्चा केली होती. राकेश टिकैत हे महेश टिकैत यांचा मुलगा असून महेश टिकैत हे मोठे शेतकरी नेते होते.

राकेश यांचा जन्म 4 जून 1969 रोजी मुजफ्फरनगर जिल्ह्यात सिसौली गावात झाला. राकेश टिकैत यांनी एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं. 1992 मध्ये राकेश टिकैत हे दिल्ली पोलीसांच्या सेवेत हवालदार म्हणून होते. पण महेंद्र टिकैत यांचे आंदोलन तेव्हा सुरु होते आणि शेतकरी आंदोलनावर जसा सरकारी दबाव वाढू लागला राकेश टिकैत यांनी नोकरीचा राजीनाम दिला.

नोकरी सोडल्यानंतर राकेश टिकैत यांनी पुर्ण वेळ किसान युनियनचे काम सुरु केले. महेंद्र टिकैत यांत्या मृत्यूनंतर राकेश टिकैत किसान युनियनेच प्रमुख नेते बनले.

राकेश टिकैत हे बलियान खाप या समाजातून येतात आणि या समाजाच्या नियमांनुसार वडीलांनंतर थोरला मुलगाचा संघटनेचा प्रमुख होतो. त्यामुळे प्रमुख हे राकेश टिकैत यांचे मोठे बंधू नरेश टिकैत झाले पण पडद्यामागून सगळी सुत्रे हे राकेश टिकैत सांभाळतात. नरेश टिकैत बालियान खापचे देखील प्रमुख आहेत बालियान खाप मुजफ्फरनगर जिल्ह्यात 80 हून जास्त गावात आहे.

महेंद्र सिंग टिकैत

राकेश टिकैत यांचे वडीलसुध्दा शेतकऱ्यांचे मोठे नेते होते. 1987 मध्ये जेव्हा उत्तर प्रदेश मध्ये वीजदरवाढीचा प्रश्न स्फोटक बनला होता तेव्हा महेंद्र सिंग टिकैत यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. तेव्हाच भारतीय किसान युनियन ची स्थापन करण्यात आली आणि महेंद्र सिंग टिकैत हे त्याचे अध्यक्ष होते.

1987 नंतर 1992-93 च्या महेंद्र सिंग टिकैत यांनी डंकल कराराविरोधात दिल्लीतल्या लाल किल्लावर मोठे जनआंदोलन उभारले होते. तेव्हा राकेश टिकैत हे दिल्ली पोलीसमध्ये काम करत होते आणि महेंद्र सिंग टिकैत यांनी हे आंदोलन मागे घ्यावे म्हणून राकेश सिंग टिकैत यांच्यावर सरकारकडून दडपण आणले जात होते. तेव्हा राकेश सिंग टिकैत यांनी पोलीसांच्या नोकरीचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर राकेश सिंग टिकैत हे पुर्ण वेळ शेतकरी आंदोलनात सक्रिय झाले आणि 1997 मध्ये भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता बनले.

शेतकरी आंदोलनासाठी राकेश सिंग टिकैत आत्तापर्यंत 44 वेळा जेलमध्ये जाऊन आले होते. तसेच राकेश सिंग टिकैत यांनी मध्य प्रदेश, राजस्थान मधल्य़ा शेतकऱ्यांसाठीसुध्दा आंदोलन केले आहे.

राकेश टिकैत यांचे राजकीय कनेक्शन

राकेश टिकैत यांच्या राजकीय महत्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. त्यांनी 2007 मध्ये बुढाना मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवली आहे. 2014 मध्ये सुध्दा त्यांनी लोकसभा निवडणुकीत चरण सिंगच्या मतदारसंघात निव़डणूक लढवली होती. राकेश टिकैत हे बालिय़ान खापचे सदस्य असल्यामुळे भाजपचे केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेनंतर राकेश टिकैत यांच्याविरुद्ध काही गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न दिल्ली पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये राकेश टिकैत यांना विचारण्यात आला आहे.

दुसरीकडे, राकेश टिकैत अजूनही गाझीपूर बॉर्डरवर ठाण मांडून बसलेले आहेत. सगळ्या पुराव्यांसह आपण दिल्ली पोलिसांना नोटीसचं प्रत्युत्तर पाठवणार असल्याची प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे.

    follow whatsapp