Old Pension Scheme : अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई तक

20 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 06:56 AM)

Old Pension Scheme : मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर (Vishwas Katkar) यांनी याबाबत माहिती दिली. तसंच उद्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सकारात्मक झाली आहे, राज्यात […]

Mumbaitak
follow google news

Old Pension Scheme :

हे वाचलं का?

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर (Vishwas Katkar) यांनी याबाबत माहिती दिली. तसंच उद्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सकारात्मक झाली आहे, राज्यात लवकरच जुनी पेन्शन योजना सुरु होणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. (Old Pension Scheme government employee strike news)

काय म्हणाले विश्वास काटकर?

बैठकीनंतर बोलताना विश्वास काटकर म्हणाले, राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. यात कोणताही भोंगळपणा नव्हता, हिंसा नव्हती. हा संप या कर्मचाऱ्यांनी यशस्वी करुन दाखविला. आज मुख्यमंत्र्यांबरोबर आमची सविस्तर चर्चा झाली आणि ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण : AJ च्या अटकेचा थरार; पोलिसांनी केली कामगिरी फत्ते!

शासनाने यासंदर्भात मागील सात दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की याबाबत ते गंभीर विचार करत आहेत. यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समिती सुरुवातीला आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक प्रस्ताव दिला. त्यानुसार प्रिन्सिपल म्हणून जुन्या पेन्शन योजनेची मागणी स्वीकारण्यात आली.

जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही, अशा स्वरुपाची लेखी भूमिका शासनाने कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ही योजना निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल”

Sanjay Raut Letter: ‘हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते’; राऊताचं उत्तर

संपकालावधीत आमच्या खात्यावरील उपलब्ध रजा मंजूर करून हे 7 दिवस नियमित करण्यात येतील. तसंच ज्यांना कारवाईसंदर्भात नोटीस गेल्या, त्या मागे घेण्यात येतील, असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिली. यावेळी काटकर यांनी उद्यापासून महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावं, असं आवाहन केलं. ते म्हणाले, ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे, जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तातडीने कशी मदत मिळेल यासंदर्भात विशेष काम करावं. रुग्णालयात तुमच्या गैरहजेरीमुळे ज्या अडचणी आल्या असतील त्यावर तातडीने काम करावं, अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

    follow whatsapp