अकोला: ‘ब्रेक द चेन’साठी राज्यातील ठाकरे सरकारने लॉकडाऊन केला असल्याने ज्यांच्या घरात लगीनघाई सुरु झाली होती त्याला मात्र करकचून ‘ब्रेक’ लागला आहे. म्हणजे सरकार म्हणतंय लग्नाला परवानगी आहे. पण खरेदी कशी करायची ते नाही सांगितलं. त्यामुळे अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे आता लग्नाचं काही खरं नाही…! असं म्हणायची अनेकांवर वेळ आली आहे.
ADVERTISEMENT
कठोर निर्बंध जाहीर करताना ठाकरे सरकार आणि प्रशासनाने लग्नासाठी पन्नास लोकांची अट घालून दिली. पण ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांनी लग्नाचा बस्ता कुठून घ्यावा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अकोल्यातील लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या गावंडे कुटुंबीयांच्या घरात पहिलचं लग्न ठरलं आहे. मोठा मुलगा तुषार याच्या लग्नासाठी 30 एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Corona टाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात, बीडमधलं लग्न चर्चेत
यासाठी नवरदेवाची आई पदर खोचून कामाला देखील लागली आहे. आपल्या मुलासाठी तिने घरातच जात्यावर हळद दळली आहे. परंपरा जुन्या काळापासून अशीच आहे ती घरच्या जात्यावर हळद दळायची. त्यामुळे सगळी तयारी जोरदार सुरुय. पण असं असलं तरी गावंडे कुटुंबीयांना एका गोष्टीची फारच चिंता लागून राहिली आहे. ती लग्नाचा बस्ता खरेदी करायचा तरी कसा आणि कुठून?
दुसरीकडे नवरा मुलगा देखील आपल्या मित्रांकडून काहीतरी ॲडजस्टमेंट करून बस्त्यासाठी दुकानं उघडतील असा प्रयत्न करतोय. फक्त बस्ताच नव्हे तर सोन्याच्या खरेदीसाठी काही करता येईल का यासाठी त्याचे बरेच प्रयत्न सुरु आहे. यासाठी नवऱ्या मुलासह त्याच्या कुटुबीयांची देखील बरीच फोना-फोनी सुरु आहे. पण यात त्यांना अद्याप तरी काही यश मिळालेलं नाही.
भयंकर… महाराष्ट्रात आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले, तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू
कारण अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील कपड्याची दुकानं आणि सोन्याची दुकान पूर्णपणे बंद झाली आहेत. लग्न ऐन तोंडावर आलेलं असताना लग्नासाठी लागणाऱ्या या गोष्टी कुठून आणि कशा पद्धतीने मॅनेज करायच्या हा यक्ष प्रश्न गावंडे कुटुंबीयांसमोर उभा राहिला आहे.
एकीकडे सरकार आणि प्रशासन म्हणतं की, लग्नसोहळ्याला अडचण नाही. फक्त मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यात गर्दी होऊ नये याची खबदारी घ्यावी. विधीवत लग्न करण्यास देखील सरकारने मान्यता दिली आहे. पण विधिवत लग्नाला लागणारे साहित्य हे कुठून आणायचे? कारण ती दुकानं सुद्धा बंद आहेत.
एवढंच काय तर नवरीसाठी शालू आणि नवरदेवाचा सूट कुठून घ्यायचा हे देखील लगीन घरातील लोकांना सुचेनासं झालं आहे.
100 टक्के Lockdown मुळे व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष-फडणवीस
हे आणि यासारखे प्रश्न सध्या गावंडे कुटुंबीयांना सतावत आहेत. सध्या आपल्यासमोरं एका गावंडे कुटुंबीयांची स्थिती आम्ही आपल्यापुढे मांडली आहे. पण राज्यात अशी परिस्थिती सध्या अनेक कुटुंबीयांची झाली असल्याचं पाहायला मिळतंय. तेव्हा गावंडे कुटुंबीयांनी ‘मुंबई तक’च्या माध्यमातून सरकारकडे विनवणी करत आहेत की आम्हाला आमच्या लग्नासाठी लागणारं गरजेचं सामान मिळावं यासाठी तरी लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणावी.
ADVERTISEMENT