महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सध्या भीषण स्वरूप धारण करते आहे हे आपण पाहिलंच आहे. अशात कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कंबर कसली आहे. आरोग्य व्यवस्था, रेमडेसिवीर, लसीचा पुरवठा, लसीकरण, ऑक्सिजनचा प्रश्न या सगळ्याबाबतची कशी तयारी आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरील लाईव्ह मध्ये सांगितलं. या भाषणाचा अर्थ काय? कोरोनाची तिसरी लाट येईल का? हे सगळं प्रश्न पुणे रेडिओसिटीचा आरजे केदार याने विचारले आहेत. त्याला आजतक चे एक्झ्युकिटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी काय उत्तरं दिली आहेत वाचा सविस्तर
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सगळ्यांनी पाहिलं तरीही याबद्दल काय महत्त्वाचे मुद्दे होते?
सगळ्यात महत्त्वाची बाब ही लॉकडाऊन झाल्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी भाष्य केलं. लोकांची अपेक्षा होती की लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राने काय मिळवलं आहे ते सांगतील. तसंच व्हॅक्सिन ड्राईव्हचं काय झालं हे देखील सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अनेक गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. ऑक्सिजनचा जेवढा पुरवठा महाराष्ट्राला लागतो आहे त्यापेक्षा जास्त पुरवठा आपल्याकडे होतो आहे. राज्यात ऑक्सिजनची निर्मिती होते आहे. काही बाहेर राज्यातून आयात करण्यात येतो.
महाराष्ट्राला रोज 1650 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागते आहे. ही गरज आपण पूर्ण करू शकतो ही महत्त्वाची बाब आहे
लसीकरणासंदर्भातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. सिरम आणि भारत बायोटेक यांच्याकडून लसी उपलब्ध होणार आहेत. तुम्ही त्यासाठी नोंदणी करा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समजावून सांगितलं. लस घेण्यासाठीही गर्दी करू नका असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.
पंधरा दिवस लॉकडाऊन होतं आणि आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, मागील लॉकडाऊनचा फायदा झाला का?
14 एप्रिल ला आपण जेव्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले तेव्हा महाराष्ट्रात साधारण 58 हजार रूग्ण महाराष्ट्रात आढळत होते. बरं होणाऱ्या रूग्णांची संख्या 39 हजारांच्या घरात होती. 27 एप्रिलपर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 66 हजारांपर्यंत गेली, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही 67 हजारांच्या घरात गेली. याचाच अर्थ असा की रूग्णसंख्या ही कुठेतरी स्थिरावली आहे असं दिसतंय. बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रूग्णवाढीमध्ये आपण कुठेतरी स्थिरावतो आहोत ही गोष्टही उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केली. त्यामुळे लॉकडाऊनचा फायदा झाला आहे. पंधरा दिवसांमध्ये खूप मोठा फरक पडला असं नाही म्हणता येणार पण संख्या स्थिरावली आहे.
मुंबई पुण्यातली परिस्थिती काय आहे?
मुंबई पुण्यात 14 एप्रिलला अॅक्टिव्ह रूग्ण जास्त होते आता दोन्ही शहरांमध्ये अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या कमी होते आहे. तसंच या दोन्ही शहरांमध्ये बरे होणारे रूग्ण वाढत आहेत. ही नक्कीच चांगली बाब आहे. टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये जास्त आहे. मुंबईत तो 9 टक्क्यांवर आला आहे. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये तो रेट अजून कमी झालेला नाही. त्यामुळे ही बाब चिंता वाढवणारी आहे. हा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट कमी होईल तेव्हा रूग्णसंख्याही कमी होताना दिसून येईल.
मुंबईतली परिस्थिती कशी सुधारली?
मुंबईत 3 एप्रिलला 11 हजार रूग्ण होते, तर आता मुंबईत चार हजार रूग्ण आढळत आहेत. मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 20 टक्क्यांच्या पुढे आला आहे तो आता ९ टक्क्यांपर्यंत आला आहे. हे परिस्थिती सुधारते आहे याचं लक्षण आहे.
1 मेपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना लस ही घोषणा तर झाली पण चित्र काय आहे?
देशभरात जवळपास अडीच कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. कोविन अॅप पहिल्याच दिवशी क्रॅश कमी झालं आहे. मात्र इतक्या लसी उपलब्ध आहेत का? जून जुलै महिन्यात लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होईल, सुरळीत होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं चित्र आहे. जर योग्य पुरवठा झाला तर त्याचप्रमाणत लसीकरणाचा वेग असू शकतो
ADVERTISEMENT