कांदा-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झाले नाहीत – केंद्रीय मंत्री कपिल पाटील

मुंबई तक

• 07:29 AM • 30 Jan 2022

केंद्रीय पंचायत राज मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार कपिल पाटील चर्चेत आले आहेत. कल्याण येथील एका कार्यक्रमात बोलत असताना कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झाले नाहीयेत असं विधान केलं आहे. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. राम कापसे स्मृती व्याख्यानमालेत कपिल पाटील बोलत होते. या […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय पंचायत राज मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार कपिल पाटील चर्चेत आले आहेत. कल्याण येथील एका कार्यक्रमात बोलत असताना कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झाले नाहीयेत असं विधान केलं आहे. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. राम कापसे स्मृती व्याख्यानमालेत कपिल पाटील बोलत होते.

हे वाचलं का?

या कार्यक्रमात बोलत असताना महागाईचं समर्थन करता येणार नाही पण यासाठी पंतप्रधान मोदींना दोष देता येणार नाही असं कपिल पाटील म्हणाले. “एकीकडे आपण ७५० किलो रुपये दराने मटण घेतो, ५००-६०० रुपयांचा पिझ्झा खातो पण दुसरीकडे ४० रुपये टोमॅटो, १० रुपये कांदा आपल्याला महाग वाटतात. कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीयेत. त्यामुळे कांदा-बटाटा, तुरडाळ, मुगडाळ यातून आपण बाहेर आलं पाहिजे. देशच नसेल तर कांदे-बटाटे कुठून खरेदी करणार?”, असं कपिल पाटील म्हणाले.

याच कार्यक्रमात बोलत असताना कपिल पाटलांनी २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मिर हा भारतात परत येऊ शकतो अशी आशा बाळगायला हरकत नाही असंही विधान केलं. CAA, कलम ३७०, 35 A यासारखे घातक कायदे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यामुळेच रद्द होऊ शकले. यासारखे धाडसी निर्णय घेण्यासाठी मोदीच पंतप्रधान पाहिजेत. असं झालं तर २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल अशी आशा आपण बाळगू शकतो, मोदीच हे करु शकतात, असंही कपिल पाटील म्हणाले.

सेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या चर्चांना पूर्णविराम- संजय राऊतांनी ‘रोखठोक’ सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात जे काम झाले ते पाहून जनता पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला निवडून देईल असंही कपिल पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल विचारलं असता कपिल पाटील यांनी सावध प्रतिक्रीया देताना महाराष्ट्रात काय चाललंय याची मला माहिती नाही, परंतू २०२४ च्या निवडणुकीत राज्यात भाजपच सरकार येईल असं कपिल पाटील म्हणाले.

    follow whatsapp