पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी पुणे पोलिसांनी जय्यत तयारी केली असून ज्या मार्गाने पंतप्रधानांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी येईल त्या मार्गावर पुणे पोलिसांनी आज एक मॉक ड्रीलही घेतलं. दरम्यान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी रविवारच्या दिवशी सामान्य नागरिकांकरता वाहतूकीच्या मार्गांमध्ये काही बदल केले आहेत.
ADVERTISEMENT
कर्वे रस्ता आणि पौड रस्ता हा सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणे वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली. गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो जंक्शन परिसरात पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम असणार आहे.
मोदींच्या पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती, शिवसेनेकडून ‘हे’ नेते लावणार हजेरी
त्यामुळे खंडोजी बाबा चौक ते शिवतीर्थ नगर परिसराचा मार्ग सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना वाहतूकीसाठी वापरता येणार नाहीये. कर्वे रस्त्यावरुन कोथरुडला जाण्यासाठी रविवारी सर्वसामान्यांनी टिळक चौकातून दांडेकर पुलावरुन करिष्मा सोसायटी किंवा डी.पी. रोडवरील म्हात्रे पुलाचा वापर करायचा आहे. शिवतीर्थ नगरातून डेक्कन रस्त्यावर येणारी वाहनं मयुर कॉलनी परिसरातून येतील.
PM Modi : मेट्रोचं उद्घाटन ते सुवर्ण महोत्सवी सोहळा… असा आहे पंतप्रधान मोदींचा दौरा
विविध कार्यक्रम आणि पुण्याची सफर! असा आहे मोदींचा दौरा –
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (६ मार्च) पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात मोदी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत.
२) पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्या सकाळी अकरा वाजता सुरूवात होणार असून, दुपारी १.४५ वाजता ते सिम्बायसिस विद्यापीठाच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. जाणून घ्या दौऱ्याबद्दल…
३) सकाळी ११ वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. हा पुतळा १८५० किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून, त्याची उंची सुमारे ९.५ फूट आहे.
४) सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
५) पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे.
६) २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.
७) एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
८) हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारला जात आहे.
९) पंतप्रधान मोदी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करणार आहे. त्यानंतर आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत.
१०) दुपारी १२ वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत.
११) मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मोदींच्या हस्ते केला जाणार आहे.
१२) नदीच्या ९ किमी लांब पात्राचं १,०८० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केलं जाणार आहे.
१३) यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असणार आहे.
१४) मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प १,४७० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह ‘एक शहर, एक ऑपरेटर’ या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे.
१५) या प्रकल्पांतर्गत एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जाणार असून, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४०० एमएलडी इतकी असणार आहे.
१६) बाणेर येथे १०० ई-बस आणि ई-बस डेपोचेही लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे.
१७)) पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
१८) या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे, जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे.
१९) व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
२०) दुपारी १:४५ वाजता पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत.
ADVERTISEMENT