तृणमूल खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांचं लग्न मोडलं आहे. नुसरत जहाँ आणि त्यांचे पती निखिल जैन वेगळे झाले आहेत. एवढंच नाही तर हे दोघे मागच्या नोव्हेंबरमध्येच एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच नुसरत जहाँ या गरोदर असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र निखिल जैन यांचं म्हणणं आहे की नुसरत प्रेग्नंट असल्याची आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. एवढंच नाही तर नुसरत जहाँ यांचं अॅक्टर यश दासगुप्तासोबत अफेअर असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. आता त्या पतीपासून विभक्त झाल्याचीच बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेसोबत नुसरत यांचे पती निखिल जैन यांनी सविस्तर संवाद साधला.
ADVERTISEMENT
अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनी हे म्हटलं आहे की तुर्की मॅरेज अॅक्टनुसार निखिल सोबत झालेलं लग्न हे अवैध आहे. निखिल जैन आणि नुसरत यांचं लग्न इंटरफेथ मॅरेज अर्थात दोघांचे धर्म वेगळे असताना झालेलं लग्न आहे. भारतात या लग्नाला वैधानिक मान्यता होती. मात्र अद्याप असं झालेलं नाही. कायदेशीर प्रक्रिया पाहिल्यास हे लग्न दोघांना मान्य नाही. ते दोघेही लिव्ह इन मध्ये वास्तव्य करत होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.
निखिल जैन यांनी काय म्हटलं आहे?
माझ्या मते आमचं लग्न कायदेशीर आहे. मात्र आता मला या विषयावर काहीही भाष्य करणार नाही. आमचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहचलं आहे. मी सिव्हिल सूट फाईल केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी मी तोपर्यंत बोलणार जो पर्यंत हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मात्र याचसोबत निखिल जैन यांनी हेदेखील सांगितलं की आम्ही मागच्या वर्षी नोव्हेंबरपासूनच विभक्त झालो आहोत. आता आमचे मार्ग वेगळे आहेत.
नुसरत जहाँ यांनी काय म्हटलं आहे?
निखिल आणि माझे मार्ग खूप आधीच वेगळे झाले आहेत. मात्र याबाबत मी कुणालाही माहिती देणं योग्य समजलं नाही. तसंच हे माझं व्यक्तिगत आयुष्य आहे जे मी कोणासोबत वाटायचं नाही असं ठरवलं आहे. आमचं लग्न कायदेशीर रित्या अमान्य आहे आणि कायदेशीर दृष्टीकोनातूनही अमान्य आहे.
पती निखिल जैन यांचं नाव न घेता एक आरोपही नुसरत यांनी केला आहे. जो व्यक्ती स्वतः श्रीमंत असल्याचे दावे करतो तो श्रीमंत नाही. कारण खूप काळापासून तो व्यक्ती माझ्याच अकाऊंटमधून बेकायदेशीररित्या पैसे काढतो आहे. माझ्यापासून वेगळं झाल्यापासूनही त्या व्यक्तीने (निखिल जैन) रात्री तर कधी कधी मध्यरात्रीही माझ्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत. मी याबाबत पोलिसातही तक्रार केली आहे. माझ्या अनेक वस्तू जसे की माझ्या बॅग्ज, कपडे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी या त्या व्यक्तीकडेच आहेत. माझ्या कुटुंबाने, मित्र परिवाराने जे दागिने मला दिले होते ते अजूनही त्याच व्यक्तीकडे आहेत असाही आरोप नुसरत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT