ADVERTISEMENT
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपल्यावर देवीची मूळ अष्टभुजा मूर्तीची पलंगावरून विधीवत पूजा करून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
तुळजाभवानी देवी देशातील एकमेव चलमूर्ती असल्याने तिला निद्रेसाठी वर्षातून 3 वेळेस 21 दिवसांसाठी शेजघरात निद्रेसाठी ठेवलं जातं.
हा विधी कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे, ज्यात तुळजाभवानी देवी पलंगावर झोपविण्यात आल्यावर तिला उठवताना आरती केली जाते.
त्यानंतर देवीला हळद व इतर लेप लावला जातो व मूर्ती उचलून सिंहासनावर नेली जाते.
महिषासुर दैत्याचा वध केल्यानंतर नवरात्रीनंतर देवीची 5 दिवसांची श्रम निद्रा पौर्णिमेला संपली.
देवीच्या धार्मिक विधी केल्यानंतर पंचामृत स्नान, धूप आरती व पूजा करण्यात आली.
यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
देवीचे माहेर असलेल्या नगरहुन आलेल्या पलंगावर देवी निद्रेसाठी होती, तो पलंग हवन कुंडात टाकण्यात आला.
भोपे पूजारी यांच्या वतीने देवीची आरती करण्यात आली.
यानिमित्ताने आई तुळजाभवानी देवीचा गाभारा व मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.
ADVERTISEMENT