मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मतं जिंकत एकनाथ शिंदे यांनी हा ठराव जिंकला. २१ जूनला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीला २९ आमदार होते. ती संख्या त्यानंतर ३९ झाली. त्यानंतर ५१ झाली. त्यापाठोपाठ आज आणखी एक आमदार त्यांना येऊन मिळाले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी जे बंड पुकारलं त्याची सुरूवात २०१४ मध्येच झाली होती असं कळतंय.
ADVERTISEMENT
दोनवेळा कसं डावललं गेलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केला गौप्यस्फोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावानंतर जे भाषण केलं त्यात त्यांनी असे दोन निर्णय सांगितले ज्यामुळे या बंडाची सुरूवात झालेली असू शकते ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
२०१४ ला काय घडलं होतं?
२०१४ ला भाजप-शिवसेनेचं hiv Sena) सरकार आलं. त्यावेळचा एक निर्णय कसा घेतला गेला नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ”२०१४ ला देवेंद्र फडणवीस शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार होते. मात्र त्यांनी (उद्धव ठाकरे) ते स्वीकारलं नाही. कारण हा निर्णय स्वीकारला असता तर ते पद मला द्यावं लागलं असतं. हे आज एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं.
२०१९ ला काय घडलं होतं?
२०१९ ला महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार आलं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून माझंच नाव चर्चेत होतं. उद्धव ठाकरे मलाच मुख्यमंत्री करणार होते. मात्र नंतर त्यांनी मला सांगितलं की शरद पवार यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू नका. त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावं लागतं आहे असं उद्धव ठाकरे मला म्हणाले. मी म्हटलं की ठीक आहे माझी काहीच हरकत नाही.
या सगळ्यानंतर एकदा अजितदादा मंत्रालयात बोलत होते. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांच्याबाबतचा किस्सा सुरू होता. त्यावेळी अजितदादा म्हणाले की इथेही अपघातच झाला आहे. मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं की तुम्ही हे जे वाक्य उच्चारलं त्याचा अर्थ काय? तर ते म्हणाले की आमचा तुमच्या नावाला विरोध असण्याचा काही प्रश्नच नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे या नावाला विरोध केलेला नाही. मुख्यमंत्रीपद कुणाला मिळावं हा निर्णय तुमच्या पक्षाने घेतला आहे. मी सगळं विसरूनही गेलो मला त्या पदाचा मोह कधीच नव्हता.
एकनाथ शिंदे सभागृहात बरसले! मुख्यमंत्रीपदापासून ते संजय राऊतांपर्यंत घेतला समाचार
उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडताना काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडलं आणि मातोश्रीवर राहायला गेले. त्यावेळी त्यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की मला पदाचा काहीही मोह नव्हता. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शऱद पवार यांनी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितलं म्हणून मी मुख्यमंत्री होतो आहे. तसंच वर्षा बंगला मी सोडतो आहे. मला पदाचा मोह नाही. हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताना केलं होतं.
आता एकनाथ शिंदे यांनी यांनी सोमवारी केलेल्या भाषणात बंड का पुकारलं त्याची कारणं सविस्तरपणे सांगितली. एवढंच नाही तर आपल्याला पदाचा मोह नव्हता. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या मनातलं सरकार आणायचं होतं त्यामुळे आपण हा निर्णय घेतला. तसंच मी नगरविकास मंत्री असताना अजित पवार माझ्या खात्यात हस्तक्षेप करत होते. त्यानंतर इतरांचाही हस्तक्षेप वाढला. हा त्यांचा रोख थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे होते.
‘अजित पवार आणि भाजपमधील प्रेम पाहून कोणाच्या तरी पोटात दुखतंय’, बावनकुळेंचा नेमका टोला कोणाला?
राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन
या सगळ्यात विशेष बाब ही आहे की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होतो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्यावर शरद पवार किंवा अजित पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तसंच सोमवारी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अजित पवार त्यांना जे म्हणाले की आमचा तुमच्या नावाला विरोध कधीच नव्हता. त्यावरही अजित पवार यांनी काहीही उत्तर दिलं नाही. राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचं सूचक मौन या सगळ्यावर पाहण्यास मिळालं.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर बोलताना त्यांनी गौप्यस्फोट केले. अजित पवारांनी त्यांना काय सांगितलं होतं याचं उदाहरणही त्यांनी दिलं. या सगळ्यात पक्ष हा निर्माण झाला की २०१४ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं होतं तेव्हा शिवसेनेने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री करावं लागेल म्हणून ते पदच नाकारलं का? तिथूनच एकनाथ शिंदे यांच्या मनातली खदखद सुरू झाली का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ADVERTISEMENT