राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. अशातच मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. उमेश आणि प्रियां या दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. दोघंही योग्य ती काळजी घेत असल्याचं सांगण्यात आलंय.
ADVERTISEMENT
उमेशने स्वतः इन्स्टाग्रामवरून याबाबतची माहिती दिली आहे. उमेश त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “दुर्देवाने माझी आणि प्रियाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. आम्ही स्वतःला घरा क्वारंटाइन केलं आहे. आम्ही आमची योग्य ती काळजी घेत आहोत. त्याचप्रमाणे प्रोटोकॉल्सचं देखील पालन करतोय. गेल्या एका आठवडण्यात आमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कृपया त्यांची चाचणी करून घ्यावी.”
ADVERTISEMENT