संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथेप्रमाणे संसदेच्या आवारात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असून, खासदारांनी निवडणुकांचा विचार न करता चांगल्या उद्देशाने आणि संवेदनशीलपणे चर्चा घडवून आणाव्यात असं आवाहन केलं.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी देशभरातील सर्व खासदारांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारतासाठी या अर्थसंकल्पात खूप संधी उपलब्ध आहेत. भारताची आर्थिक प्रगती, कोरोना लसीकरण, लस संशोधन या गोष्टीत जगभरात विश्वास निर्माण करत आहे’, असं मोदी म्हणाले.
चहा-कॉफी आणि मसाल्यांशी संबंधित कायदे बदलणार, मोदी सरकार रद्द करणार इंग्रजांचे नियम
‘या अधिवेशनातही खासदारांच्या चर्चा. खासदारांच्या चर्चेचे मुद्दे. मुक्तपणे केली जाणारी चर्चा ही भारतासाठी जागतिक पटलावर प्रभाव निर्माण करणारी संधीच ठरू शकते. सर्व खासदार, सर्व राजकीय पक्ष खुल्या मनाने चांगली चर्चा करून देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी मदत करतील, अशी आशा मी व्यक्त करतो,’ असं आवाहन करत पंतप्रधानांनी विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
‘निवडणुकांमुळे अधिवेशनंही प्रभावित होतात. चर्चांवरही परिणाम होतो. तरीही मी सर्व खासदारांना आवाहन करतो की, निवडणुका त्यांच्या जागी आहेत. त्या होतच राहतील. पण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन खुप महत्त्वाचं असतं. सर्व प्रतिनिधी कटिबद्ध होऊन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी करूया. येणारं पूर्ण वर्ष आपल्याला देशाला नव्या आर्थिक उंचीवर घेऊन जाण्यात मदत होईल. मुक्तपणे, संवदेनशीलपणे आणि चांगल्या उद्देशाने चर्चा व्हावी,’ असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT