union budget 2023 live updates fm nirmala sitharaman budget speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला असताना आणि मंदीचं सावट असताना हा अर्थसंकल्प मांडला जात असल्यानं सगळ्याचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे महागाईच्या झळा जाणवत असताना सर्वसामान्यांनासह मध्यमवर्गीयांना सरकारकडून दिलासा मिळणार की आणखी प्राप्तिकराचं ओझं वाढणार, याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.
निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा
2024 तयारी सुरू! मोदी सरकारने बजेटमध्ये केली सर्वात मोठी घोषणा
प्राप्तिकरांच्या मर्यादेत वाढ करून सरकार दिलासा देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. महागाईत होरपळणाऱ्या मध्यमवर्गीय करदात्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.
ADVERTISEMENT
काय स्वस्त, काय महाग होणार?
-खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल स्वस्त होईल.
-इलेक्ट्रॉनिक वाहनं स्वस्त होणार.
-परदेशातून येणारी चांदी होणार महाग
-देशी बनावटीची किचन चिमणी होणार महाग
-काही मोबाईल फोन्स, कॅमेऱ्याच्या लेन्स स्वस्त होणार.
सिगारेट महाग होणार.
5जी वर संशोधन करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 100 लॅब तयार केल्या जाणार.
-स्क्रपिंग पॉलिसीतंर्गत जुन्या वाहनं बदलली जाणार. केंद्र सरकार जुनी वाहनांचं स्क्रपिंग करणार. राज्य सरकारांचाही पाठिंबा. जुन्या रुग्णवाहिकाही बदलणार. त्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाणार.
-ग्रीन अॅग्री ला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम प्रणाम योजना, 200 बायोगॅस प्लांटसाठी गोवर्धन योजना.
-10 हजार बाय इनपूट संशोधन केंद्र स्थापन केली जाणार
-पीएम आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक केला जात आहे.
-पुढील 3 वर्षात सरकार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी 740 एकलव्य मॉडेल स्कूलसाठी 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल.
-देशात 50 नवीन विमानतळं बनवली जातील.
निर्मला सीतारामन यांच्या सात घोषणा
-मुलं आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय स्थापन केलं जाईल.
-पशुपालन, डेअरी आणि मत्स्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करून कृषी कर्जाचं उद्दिष्ठ वाढवून 20 लाख कोटी रुपये केलं जाईल.
-कृषी क्षेत्राशी स्टार्टअप्सना अग्रक्रम दिला जाईल.
-2014 पासून उभारण्यात आलेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच सलग्नित 157 नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील.
कृषी क्षेत्राशी निगडीत स्टार्टअप्सला सरकार देणार ताकद
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, कृषी क्षेत्राशी निगडीत स्टार्ट अप्सना प्राधान्यक्रम दिला जाईल. त्यासाठी युवा उद्योजकांच्या माध्यमातून स्टार्टअप्सना प्रोत्साहित करण्यासाठी अॅग्रीकल्चर अॅक्सिलेटर फंड तयार केला जाईल.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, 2014 पासून सरकारच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांचं जीवनमान उंचावलं असून, अधिक गुणवत्तापूर्ण झालं आहे. दरडोई उत्पन्न दुप्पटीने वाढून 1.97 लाख रुपयांवर गेलं आहे. गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी 5वी अर्थव्यवस्था आहे.
कोरोना काळात सरकारने हे निश्चित केलं की कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही. सरकारने 2 लाख कटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळेल, याची काळजी घेतली. 28 महिन्यांपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत रेशन मिळेल याची व्यवस्था केली.
भारतीय अर्थव्यवस्था जगभरात झळकणारा तारा
बजेट भाषणाच्या सुरुवातीलाच निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला झळकणारा तारा म्हणून मान्य केलंय. जगात भारताची पत वाढली आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेनं जात असून, उज्वल भविष्याच्या दिशेने प्रगती करत आहे.
Union budget 2023 : मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी, थोड्याच वेळात होणार सादर
केंद्रीय अर्थसंकल्पाचे गठ्ठे संसद भवन परिसरात आणण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आता थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करतील.
Union Budget 2023 Updates : निर्मला सीतारामण राष्ट्रपती भवनात
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. त्यानंतर त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणार असून, 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.
Union Budget 2023 Updates : केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी केली पूजा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेकडे रवाना झाल्या असून, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मंदिरात जाऊन पूजा केली.
Union Budget 2023 Updates : टॅक्समध्ये कपात की वाढ?
मोदी सरकारने 2020 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात बदल केला होता. त्यामुळे आता महागाईमुळे त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीयांना सरकारकडून आयकरात सूट मिळण्याची आशा आहे. त्याचबरोबर 80c ची मर्यादाही 2 लाखांपर्यंत केली जावी, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे अर्थमंत्री दिलासा देणार की आणखी खिशाला कात्री लावणार? हे बजेटमधून दिसेल.
Union Budget 2023 Updates : मोदी सरकार कोणत्या घोषणा करणार?
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सगळ्याचं लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी रोखण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलणार? त्याचबरोबर सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयांचं जगणं सुकर व्हावं यासाठी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार का? हेही महत्त्वाचं असणार आहे.
Union Budget 2023 Updates : सीतारामण 11 वाजता मांडणार अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. वर्षअखेरीस 5 राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानंही हा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मंदीची भीती व्यक्त केली जात असताना हा अर्थसंकल्प सादर केला जात असून, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण कोणत्या मोठ्या घोषणा करतात, हेही महत्त्वाचं असणार आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात विकासाचा दर 6 ते 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT