योगेश पांडे, प्रतिनिधी, मुंबई
ADVERTISEMENT
पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका आणि त्यांचा प्रचार यामध्ये व्यस्त असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी रात्री मैदानात उतरून थेट बॅटिंग चा आनंद लुटला… त्यांच्या या बॅटिंग ची चांगलीच चर्चा नागपुरात सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान आणि मातोश्री फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लिग’ला भेट दिली. यावेळी नितीन गडकरी यांनी स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. नितीन गडकरी हे त्यांच्या खास शैलीतल्या भाषणासाठी ओळखले जातात. मात्र क्रिकेटची त्यांना खूप आवड आहे. ते लहान असल्यापासून क्रिकेट खेळतात हे त्यांनी मागेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
गोव्यात ज्याप्रमाणे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे कायम लोकांमधे मिसळताना दिसत असत, त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांचं व्यक्तिमत्त्व आहे. नितीन गडकरींना याआधीही नागपूरमध्ये अनेकदा स्कुटरवर फिरतानाही पाहिलं गेलं आहे. केंद्रीय मंत्री असले तरीही त्यांचा साधेपणा हा कायमच लोकांना भावतो. त्यामुळेच नितीन गडकरींसोबत नागपूरकर कायमच असतात.
आता गुरूवारी नागपूरकरांनी नितीन गडकरी यांचं क्रिकेट प्रेमही अनुभवलं. नागपूर येथे माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान आणि मातोश्री फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लिग’ला भेट दिली. यावेळी नितीन गडकरी यांनी स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. त्यावेळी फोटो काढणाऱ्यांची आणि नितीन गडकरी क्रिकेट खेळत आहेत तो क्षण मोबाईलमध्ये टीपणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती.
ADVERTISEMENT