महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट आता ओसरू लागल्याची चिन्हं दररोज दिसू लागली आहेत. असं असलं तरीही सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. एप्रिल महिन्यात हे निर्बंध लागू करण्यात आले होते जे आता हळूहळू शिथील करण्यास सुरूवात झाली आहे. असं असलं तरीही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या आणि मृत्यूंचं प्रमाण हे झपाट्याने वाढलं. आता तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील केले जात आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पाच टप्पे तयार केले आहेत.
पहिल्या गटातील जिल्हे, कुठे किती आहे पॉझिटिव्हिटी रेट?
अहमदनगर (3.6), अकोला (4.97), अमरावती (1.97), औरंगाबाद (2.94), भंडारा (0.96), बुलढाणा (2.98), चंद्रपूर (0.62), धुळे (2.42), गडचिरोली (3.53), गोंदिया (0.27), हिंगोली (1.93), जळगाव (0.95), जालना (1.51), लातूर (2.55), मुंबई (3.79), नागपूर (1.25), नांदेड (1.94), नंदूरबार (3.13), नाशिक (4.39), परभणी (0.94), सोलापूर (3.73), ठाणे (4.69), वर्धा (1.12), वाशिम (2.79), यवतमाळ (3.79)
Mumbai Unlock: मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांहून कमी तरीही मुंबईकरांवर Level-3 चे निर्बंध
असे असू शकतात या जिल्ह्यांतील अनलॉकचे नवे नियम –
१) अत्यावश्यक सेवेतली दुकानं – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
२) अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
३) मॉल-थिएटर, मल्टिप्लेक्स, सिंगल थिएटर, नाट्यगृह – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, ५० टक्के क्षमतेने
४) रेस्टॉरंट – रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने
५) लोकल ट्रेन – नियमीत सुरु राहतील
६) सार्वजिनक जागा, मोकळी मैदानं, सायकलिंग ट्रॅक – सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील
७) खासगी कार्यालय – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
८) क्रीडा – आऊटडोअर स्पर्धा फक्त सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत
९) सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम – ५० टक्के क्षमतेने किंवा किमान १०० माणसांची मर्यादा
१०) चित्रीकरण – नियमीत सुरु राहिल
११) लग्न आणि इतर समारंभ – १०० माणसांची मर्यादा किंवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के
१२) अंत्यविधी – फक्त ५० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी
सरकारने ही नियमावली दिली असली तरीही अंतिम निर्णय काय घेतला जाईल ? हे जिल्हाधिकाऱ्यांवर सोडलं आहे. जिल्हाधिकारी तिथली परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहेत.
ADVERTISEMENT