UPSC मुलाखतीत महाराष्ट्रातल्या वारली पेंटिंग साडीबाबतचा प्रश्न, अपालाने मिळवले जबरा मार्क्स!

मुंबई तक

• 10:21 AM • 01 Oct 2021

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगातील (UPSC)परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्यातही मुलाखतीवेळी उमेदवाराला बुचकाळ्यात पाडणारे अनेक प्रश्न विचारले जातात. असेच काहीसे प्रश्न हे यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत टॉपर राहिलेल्या आणि विक्रमी गुण मिळवलेल्या अपाला मिश्रा हिला विचारण्यात आले. याच सगळ्याबात अपाला मिश्रा हिने ‘न्यूज तक’शी बोलताना अनेक मजेशीर किस्से […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगातील (UPSC)परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्यातही मुलाखतीवेळी उमेदवाराला बुचकाळ्यात पाडणारे अनेक प्रश्न विचारले जातात. असेच काहीसे प्रश्न हे यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत टॉपर राहिलेल्या आणि विक्रमी गुण मिळवलेल्या अपाला मिश्रा हिला विचारण्यात आले. याच सगळ्याबात अपाला मिश्रा हिने ‘न्यूज तक’शी बोलताना अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत.

हे वाचलं का?

गाझियाबादच्या अपाला मिश्रा या तरुणीने यूपीएससी परीक्षेत घवघवीत असं यश मिळविलं आहे. तिला तिच्या मुलाखती अनेक इंटरेस्टिंग असे प्रश्न विचारण्यात आले.

यूपीएससी परीक्षेत अपालाने फक्त नववा क्रमांकच नाही मिळवला तर मुलाखतीत विक्रमी गुणंही मिळवले. मागील वर्षी मुलाखतीत 212 गुणांचा विक्रम होता. हाच विक्रम अपालाने तोडला आहे. तिने मुलाखतीत यावेळी 215 गुण मिळवले आहेत. अपाला हिची मुलाखत तब्बल 40 मिनिटं सुरु होती. त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या पॅनलने अपालाला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले.

मात्र, अपालाला सर्वात इंटरेस्टिंग प्रश्न हा वाटला की, तिने परिधान केलेल्या साडीच्या पदरावरील नक्षीबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला.

‘मला एक प्रश्न खूपच इंटरेस्टिंग वाटला. त्यांनी मला विचारलं की, ‘आपण जी साडी परिधान केली आहे. त्याच्या पदराच्या बॉर्डरवर जी नक्षी आहे त्याला काय म्हणतात?’

‘मी त्यांना सांगितलं की, ही साडीवर असलेली नक्षी म्हणजे वारली पेंटिंग आहे. तर त्यांनी मला विचारलं की, ‘ही चित्रकला नेमकी कुठे आढळते?’ तर मी त्यांना सांगितलं की, ‘महाराष्ट्रात ही चित्रकला आपल्याला पाहायला मिळते ज्याला वारली पेंटिंग असं म्हणतात.’ मला वाटतं की, हा खरोखरच इंटरेस्टिंग प्रश्न होता.

‘माझे वडील हे लष्करात आहेत तर लष्कराशी संबंधित मला काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यापैकी एक चांगला प्रश्न विचारण्यात आला. त्यात त्यांनी असं म्हटलं की, ‘तुम्ही लष्कराला अगदी जवळून पाहिलं आहे. तुम्हाला त्यांच्या चांगल्या गोष्टी तर माहित आहे. पण तुम्ही आम्हाला त्यांच्यासमोरील आव्हानं काय आहेत? ते सांगा.’ तो देखील एक चांगला प्रश्न होता.

‘मी उत्तर देताना असं सांगितलं की, ‘मला वाटतं लष्करात चॅलेंजेस तर नक्कीच आहेत. सलग त्यात चांगल्या सुधारणा देखील घडत आहेत. मी जसं सगळ्यात पहिले सांगितलं होतं की, लष्करात जो जेंडर रेशिओ आहे तो थोडा असंतुलित आहे. मी महिलांच्या लष्कर प्रवेशाबाबत देखील त्यावेळी म्हटलं होतं. पण ही खूपच आनंदाची गोष्ट आहे की, काही दिवसांपूर्वीच असा निर्णय झाला आहे की, महिलांना एनडीए आणि सैनिकी शाळांमध्ये देखील आता प्रवेश दिला जाणार आहे.’

‘मी ‘मेक इन इंडिया’ डिफेन्सवर देखील भाष्य केलं. जे हळूहळू सुधारत चाललं आहे. एक टेक्नॉलॉजी डिफेन्स हा मुद्दाही आहे. त्यातही आता सुधारणा होत आहेत.’

‘मी इंटरव्ह्यू रुममध्ये प्रवेश केल्यानंतर मला पहिलाच प्रश्न असा विचारण्यात आला की, तुमच्या अपाला या नावाचा अर्थ काय आहे?’

‘माझं नाव हे माझ्या आईने ठेवलेलं आहे. जी स्वत: एक हिंदी साहित्याशी निगडीत आहे. अपाला याचा अर्थ ऋग्वेद काळात एक आघाडीची महिला होती. ज्यांनी आपल्या ऋग्वेद रचनांमध्ये खूप बरंच योगदान दिलं आहे. तसंच त्या काळातील त्या एक स्वत: महिला ऋषी देखील होत्या. तसेच अपाला यांनी काही रोगांवर आयुर्वेदिक मात्रा देखील शोधल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावावरुनच माझंही नाव अपाला ठेवण्यात आलं आहे.’ याच प्रश्नाने माझ्या मुलाखतीची सुरुवात झाली होती.

अपाला हिने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश मिळवलं आहे. अपालाचा पहिला आणि दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला पण तिने अजिबात हिंमत सोडली नाही. ऑक्टोबर 2020 मध्ये तिने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी तिने संपूर्ण देशातून नववा क्रमांक मिळवला.

UPSC Result 2020: मोठ्या पगाराची नोकरी सोडली, ‘या’ तरुणाने UPSC मध्ये कसं मिळवलं यश?

अपालाच्या यशाचा मंत्र काय?

मला वाटतं स्वत:वर असणारा आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे या परीक्षेसाठी. भले मग कोणतीही परीक्षा असो. मग ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत का असेना. स्वत:वर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तसंच स्वत:ला शांत आणि संयमी ठेवणं गरजेचं आहे.

मुलाखतीसाठी मी बरीच तयारी केली होती. जेव्हा मी मुलाखत दिली तेव्हा मला खूपच चांगलं वाटलं होतं. आतापर्यंत मुलाखतीच्या मार्कांमध्ये 212 गुण हा विक्रम होता. त्यामुळे माझे वडील म्हणत होते की, तुला देखील 212 गुण मिळतील. पण मला अजिबात अपेक्षा नव्हती की, त्यापेक्षाही अधिक गुण मिळतील म्हणून.

    follow whatsapp