UP election results : भाजपने उत्तर प्रदेशात कसा घडवला इतिहास? ही आहेत १० कारणं…

मुंबई तक

• 05:01 AM • 12 Mar 2022

देशाचं लक्ष लागलेल्या आणि भाजपसह समाजवादी पक्ष, काँग्रेसने वर्चस्व पणाला लावलेल्या उत्तर प्रदेशातील निकालांनी सर्व चित्र स्पष्ट झालं. निवडणुकीतील निकालांनी भाजपचा हुरूप वाढवला आहे,तर काँग्रेसला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निकालाने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आव्हानात्मक स्थिती असतानाही भाजपनं उत्तर प्रदेशात बाजी कशी मारली? अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. जाणून घेऊयात […]

Mumbaitak
follow google news

देशाचं लक्ष लागलेल्या आणि भाजपसह समाजवादी पक्ष, काँग्रेसने वर्चस्व पणाला लावलेल्या उत्तर प्रदेशातील निकालांनी सर्व चित्र स्पष्ट झालं. निवडणुकीतील निकालांनी भाजपचा हुरूप वाढवला आहे,तर काँग्रेसला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निकालाने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आव्हानात्मक स्थिती असतानाही भाजपनं उत्तर प्रदेशात बाजी कशी मारली? अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. जाणून घेऊयात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची दहा कारणं…

हे वाचलं का?

मोदी-योगींची जादू कायम

२०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा दिला नव्हता. त्यावेळी मोदींच्या चेहऱ्यावर लढवली होती. त्यावेळी अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शाहांनी त्यावेळी निवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात योगी आदित्यनाथ एक नेतृत्व म्हणून समोर आले.

यावेळच्या निवडणुकीत योगींची प्रतिमा बुलडोजर बाबा म्हणून पुढे आली आणि त्याचा प्रभावही दिसून आला. योगींनीही त्यांच्या प्रचारसभांमधून बुलडोजर बाबांच्या प्रतिमेवरच भर दिला. काही सभांमध्ये त्यांनी बुलडोजर दुरुस्तीसाठी गेले असून, १० मार्चनंतर रस्त्यावर दिसतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या आक्रमकपणाचाही चर्चा स्थानिक पातळीवर होत राहिली.

अमित शाहांची रणनीती

२०१७ मध्ये भाजपने विजय मिळवल्यानंतर शाहांना चाणक्य म्हटलं गेलं. यावेळी अमित शाह पक्षाध्यक्ष नसले, तरी निवडणुकीमध्ये त्यांनी पुर्ण लक्ष घातलं होतं. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी देशात शेतकरी आंदोलन बरंच गाजलं होतं. याचा फटका उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पश्चिम उत्तर प्रदेशात डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी जाट समुदायांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शाहांनी पुढाकार घेत जाट नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचे मुद्दे निवडणुकीनंतर त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिलं. त्याचबरोबर शाह यांनी एनडीएतील पक्षांसोबत जागा वाटप आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा केली आणि समन्वयाचं काम केलं.

भाजपचं सोशल इंजिनिअरिंग यशस्वी

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया पाहणीतील माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशात भाजपचं सोशल इंजिनिअरिंग यशस्वी ठरलं आहे. मुस्लिम-यादव समीकरणाचा फायदा समाजवादी पक्षाला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, कोरोना काळात १५ कोटी लोकांना मोफत रेशन योजनेचा मिळालेला लाभ, ४३ लाख लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेली घरं, सौभाग्य योजनेतंर्गत दीड कोटी लोकांना मोफत वीज, मोफत शौचालय, उज्वला योजना यांचा फायदाही भाजपला झाला असल्याचं बोललं जात आहे. सोशल इंजिनिअरिंग यशस्वी व्हावं म्हणून भाजपकडून गेल्या वर्षभरापासून त्यासंदर्भात काम केलं जातं होतं.

यादव-मुस्लिम ‘सपा’सोबत, अन्य ओबीसी समुदायांवर भाजपची पकड घट्ट

विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून यादव-मुस्लिम मतांवर समाजवादी पक्षांची पकड असणार असल्याचं दिसत होतं. एक्झिट पोलमधून समोर आलेल्या माहितीनुसार ८३ टक्के मुस्लिम मतदारांचं मत सपाला मिळताना दिसलं. त्याचबरोबर ८६ टक्के यादव मते समाजवादी पक्षालाच जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. दुसरीकडे औवेसींनी ताकद लावली होती. बीएसपीला तीन ते चार टक्के मुस्लिम मतं मिळाली.

असं असतानाही भाजपला मिळालेल्या मतांचं विश्लेषण केलं तर असं दिसते की यादवांची १० टक्के, तर मुस्लिमांची ८ टक्के मते भाजपला मिळाली असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर ४७ टक्के जाट समुदायाची मते, ५८ टक्के मते कुर्मी समुदायाची आणि ६५ टक्के अन्य ओसीबी समुदायातील मतदारांची मते मिळाल्याचं दिसत आहे.

सवर्ण मतदारांची भाजपला साथ

उत्तर प्रदेशातील सवर्ण समुदाय भाजपसोबत असल्याचं मानलं जातं. भाजप शहरी चेहरा असलेली पार्टी असल्याचंही समजलं जातं. त्यामुळे ग्रामीण भागात भाजपला अपेक्षित मिळत नाही, असा समज आहे. मात्र, यावेळी हा समजही खोटं ठरताना दिसला. आकडेवारीनुसार शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मतदारांनीही भाजपला मते दिल्याचं दिसत आहे. सवर्ण मतदारांची विचार केला, तर ब्राह्मणांची ७० टक्के मते, राजपूतांची ७१ टक्के मते आणि ७१ टक्के इतर सवर्ण समुदायातील मतंही भाजपाला मिळताना दिसत आहे.

भाजपला मिळाली महिलांची साथ

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमधील आकडेवारीनुसार ४४ टक्के पुरुषांनी भाजपला मतदान केलं, तर ४८ टक्के महिलांची मते भाजपला मिळाल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाला पुरुष मतदारांची ४० टक्के मते मिळाली आहेत, तर महिला मतदारांची केवळ ३२ टक्केच मते मिळाल्याचं दिसत आहे.

नवमतदार

उत्तर प्रदेशात एकूण ५२ लाख नवे मतदार यावेळी नोंदवले गेले. त्यामध्ये २३.९२ टक्के पुरुष मतदार आहेत, २८.८६ लाख महिला मतदारांनी प्रथमच मतदान केलं. एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये अशी निरीक्षणं नोंदवली गेली की, १८ ते २५ वर्ष वयोगटातील ४१ टक्के मते भाजपला मिळाली. समाजवादी पार्टीला ४० टक्के, तर अन्य वयोगटातील मतदारांनी भाजपला मत दिल्याचं दिसत आहे. २६ ते ३५ वयोगटातील मतदारांची ४४ टक्के भाजपला, तर ३८ टक्के मते समाजवादी पक्षाला मिळताना दिसत आहे.

प्रामाणिक कारभाराची घोषणा यशस्वी

इतर मुद्द्यांबरोबरच भाजपने या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था, माफियांविरोधात कारवाई, गुन्हेगारांविरोधात एन्काऊंटर, तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर जोर दिला. त्याचबरोबर भाजपने एक्स्प्रेस वे, डिफेन्स कॉरिडॉर, गुंतवणुकीचं आश्वासन देत रोजगार वाढणार असल्याचं म्हटलं होतं.

समाजवादी पक्षाचं सरकार असताना उत्तर प्रदेशात कशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. कसं माफियाराज आणि घोटाळेचं सुरू होते.

    follow whatsapp