महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणाची चिंताजनक वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने लसीकरण अधिक वेगवान करायचं ठरवलं आहे. यासाठी एप्रिल महिन्यांमध्ये सुट्टीच्या दिवशी (सार्वजनिक सुट्ट्यांसह) लसीकरण सुरु राहणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यात लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल याबद्दलही उपाययोजना करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.
ADVERTISEMENT
१ एप्रिलपासून देशात लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. १ मार्चपासून सुरु झालेल्या चौथ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार होती. या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस मिळत होती. मात्र आता चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने ही अट काढली असून आता ४५ वर्षांपासून सर्व व्यक्तींना लस मिळणार आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासातील राज्यातील आकडा हा हादरवून टाकणारा आहे. कारण राज्यात आज एका दिवसात तब्बल 43,183 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा प्रचंड वाढत आहे.
दरम्यान, राज्यात काल 32,641 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 24,33,368 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.2 टक्के एवढे झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 249 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.92 टक्के एवढा आहे.
मुंबईत Corona चा कहर दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
ADVERTISEMENT