पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच हिंदू निष्ठेचे ढोल बडवत असतात. मात्र त्यांना हिंदू नर्सेसवर विश्वास नाही का? असा प्रश्न विचारत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून देशात सुरू झाला. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी लस टोचून घेतली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर त्यांनी केलेली वेशभूषा, त्यांचा वावर या सगळ्याबाबत सोशल मीडियावर टीका होते आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत प्रकाश आंबेडकर?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू निष्ठेचे ढोल बडवत असतात. पण त्यांचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही. त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. याला नेमकं कोणत्या प्रकारचं वर्तन म्हणायचं? ” या आशयाचं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एम्स रूग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत मोदींनी ट्विट करून माहिती दिली. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांच्या वरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनाही लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी कोणती लस घेतली? (PM Modi Which vaccine took?)
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत बायोटेकची कोवॅक्सिन COVAXIN (Bharat BioTech) लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. ज्याला ज्याला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.
पंतप्रधान मोदींनी कुणी टोचली लस? (Who gave it Vaccine to PM Modi?)
राजधानी दिल्लीतील एम्स या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या पुद्द्चेरी येथील रहिवासी असलेल्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. यावेळी लस टोचत असतानाचा फोटो देखील पंतप्रधान मोदींनी ट्विट केला आहे. कोरोनाची ही लस सुरक्षित असून आपण देखील ती घ्यायला हवी असं आवाहन यावेळी मोदींनी केलं आहे.
ADVERTISEMENT