वेंदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आज या प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवासेना आंदोलन करत आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येणार असलेला प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यानं एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत उतरली रस्त्यावर
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याचा विरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील १ लाख ५८ हजार कोटींचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. याच्याविरोधात आम्ही आज आंदोलन करत आहोत. वेंदाता-फॉक्सकॉन यांचं संयुक्तरित्या पुण्याच्या तळेगावमध्ये प्रकल्प करण्याचं ठरलं होतं. गुजरातपेक्षा चांगलं वातावरण महाराष्ट्रात असताना राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी केला आहे. अशा पद्धतीचं आंदोलन सबंध महाराष्ट्रात होणार असल्याचं चव्हाण म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळेंच्या विरोधात पुण्यात आंदोलन
मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्यावतीनं सुप्रिया सुळेंच्या विरोधात पुण्यात आंदोलन केलं जात आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरु आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. प्रकल्प गेल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
वरुण सरदेसाईंनी कालच दिला होता इशारा
शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.’
ADVERTISEMENT