ज्येष्ठ लोककलावंत आणि साहित्यिक बी.के. मोमीन यांचं निधन

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा लोककलावंत बी.के. मोमीन कवठेकर उर्फ बशीर कमरूद्दिन मोमीन (वय ७९) यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सध्या ते पुण्यात विमानगर इथे राहत होते. पत्रकार अन्वर मोमीन यांचे ते वडील होत. लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:07 AM • 12 Nov 2021

follow google news

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा लोककलावंत बी.के. मोमीन कवठेकर उर्फ बशीर कमरूद्दिन मोमीन (वय ७९) यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सध्या ते पुण्यात विमानगर इथे राहत होते. पत्रकार अन्वर मोमीन यांचे ते वडील होत.

हे वाचलं का?

लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रतिष्ठित विठाबाई नारायणगावकर या पुरस्काराने त्यांना गौरविलं होतं. पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले ज्येष्ठ साहित्यिक बी.के.मोमीन कवठेकर उर्फ बशीर कमरुद्दीन मोमीन यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असं लिखाण केलं आहे. त्यांच्या लिखाणावर प्रा.कसबे यांनी पीएचडी मिळवली आहे. तर मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेलं पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जाते.

कवठेकर यांची साहित्य संपदा

पद्य प्रकार – गण, गवळण, लावण्या, भावगीते, भक्तिगीते, भारूडे, सद्यस्थिती वर्णन करणारी लोकगीते, पोवाडे, कविता, बडबडगीते, कलगीतुरा, देशभक्तिपर गीते, मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी लेखन, जनजागृती करणारी गीते.

गद्य प्रकार –

आकाशवाणीवर प्रसारीत लोकनाट्य : हुंडाबंदी, व्यसनबंदी, एड्स, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, साक्षरता अभियान

वगनाट्य : भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर, सुशीला मला क्षमा कर, बाईन दावला इंगा, इष्कान घेतला बळी, तांबड फुटल रक्ताच.

ऐतिहासिक नाटकं : वेडात मराठे वीर दौडले सात, लंका कुणी जाळली, भंगले स्वप्न महाराष्ट्रा.

कविता संग्रह : प्रेमस्वरूप आई.

अभिनय – नेताजी पालकर नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, भ्रमाचा भोपऴा नाटकात तृतीयपंथीयाची भूमिका, भंगले स्वप्न महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची भूमिका.

प्रसिद्ध झालेले मराठी अल्बम – रामायण कथा, अष्टविनायक गीते, नवसाची येमाई, भाग एक व भाग दोन, सत्वाची अंबाबाई, वांग्यात गेली गुरं, कर्हा नदीच्यी तीरावर, येमाईचा दरबार आदी.

मिळालेले पुरस्कार – राज्य शासनाचा जिल्हा व्यसनमुक्ती प्रचार कार्य पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार २०१२, लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार-२०१८, छोटु जुवेकर पुरस्कार, ग्रामवैभव पुरस्कार.

    follow whatsapp