पुणे: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांचं आज (16 मे) कोरोनामुळे (Corona) निधन झालं. (Passed away) कोरोना संसर्गानंतर राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
कोरोनाची लागण झाल्याने राजीव सातव यांना तब्बल 23 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजीव सातव यांना 19 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. 22 एप्रिलला त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 25 एप्रिलला त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील जहाँगीर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधीले आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. तसेच तेव्हापासून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सर्व उपचार करण्यात येत होते. मात्र, काल त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
गेल्या काही दिवसांपासून राजीव सातव यांची प्रकृती ही सुधारत असल्याचं समोर आलं होतं. ते उपचाराला प्रतिसाद देखील देत होते. ते लवकरात लवकर या संसर्गातून बाहेर पडावे यासाठी जहाँगीर रुग्णालयातील डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. साधारण चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारली असल्याने ते कोरोनावर मात करतील अशी सर्वांना आशा होती. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
मुंबईतील PSI चा कोरोनाने घेतला बळी, दुसरी लाट ठरतेय अधिक प्राणघातक
राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द:
राजीव सातव यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते. त्यांच्या आई रजनीताई सातव या स्वत: राज्य मंत्रिमंडळात मंत्री होत्या. दरम्यान, 1999 साली राजीव सातव हे आपली आई रजनीताई सातव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होते. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आपलं एक स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत हिंगोली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे अशी राजीव सातव यांची काँग्रेसमध्ये ओळख होती. 2014 साली हिंगोलीचे खासदार म्हणून राजीव सातव हे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. पण 2019 साली त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण मागील वर्षी राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी सातव यांची तिथे वर्णी लागली होती.
45 वर्षी राजीव सातव हे यांच्यावर अनेकदा राहुल गांधी यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मागील काही वर्षापासून गुजरातचे काँग्रेस कमिटीचे प्रभारी देखील होते. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सातव यांनी काँग्रेसची चांगली मोट बांधली होती. त्यामुळेच काँग्रेसला गुजरातमध्ये चांगलं यश मिळालं होतं. गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता काबीज करता आली नव्हती. मात्र, यावेळी त्यांची आमदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली होती.
चांगले उपचार मिळाले असते तर…; फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर अभिनेता राहुल वोहराचं निधन
दरम्यान, 2010 ते 2014 साली राजीव सातव हे भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्षही होते. यावेळी त्यांनी बरंच चांगलं काम केलं होतं. त्यामुळे ते राहुल गांधींच्या अधिक जवळ पोहचले होते.
ADVERTISEMENT