Vidhan Parishad Election: लक्ष्मण जगताप कार्डियाक ॲम्बुलन्सने मतदानाला जाणार

मुंबई तक

• 04:37 AM • 20 Jun 2022

पुणे: आज विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) होत असून सर्वच पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने आपला संपूर्ण कस या निवडणुकीत लावला आहे. भाजपचे आमदार चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहीकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळात जाणार आहेत. लक्ष्मण जगताप हे अतिशय आजारी […]

Mumbaitak
follow google news

पुणे: आज विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) होत असून सर्वच पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने आपला संपूर्ण कस या निवडणुकीत लावला आहे. भाजपचे आमदार चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहीकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळात जाणार आहेत. लक्ष्मण जगताप हे अतिशय आजारी असल्याने, ते आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी, एका खासगी कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे सकाळी आठ वाजता रवाना झाले आहेत.

हे वाचलं का?

यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असणार आहे. सकाळी आठ वाजता पिंपरी-चिंचवड वरून मुंबईकडे निघाल्यानंतर, जवळपास अकरा वाजता दरम्यान लक्ष्मण जगताप हे विधीमंडळात पोहोचणार आहेत.

पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यावर, देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले, पक्षातील सर्वजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष ममत्व वाटत असल्याची भावना भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीला जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर राज्यसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार आजारी असताना देखील रुग्णवाहिकेतून मुंबईत मतदानासाठी दाखल झाले होते. या दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने धनंजय महाडिक निवडून आले होते.

तर आता पुन्हा आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

    follow whatsapp