Vidhan Sabha: खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं काम, खोटे आरोप लावून १२ आमदारांचं निलंबन – देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

• 06:52 AM • 06 Jul 2021

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजला तो भाजपने चालवलेल्या प्रारुप विधानसभेने. १२ आमदारांवर निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाबाहेर प्रतिविधानसभा चालवली. परंतू सभागृहात यावर आक्षेप घेण्यात आला. अखेरीस तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हे कामकाज थांबवण्याचे आदेश दिले. यानंतर मार्शल्सनी हे कामकाज थांबवलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. “लोकशाहीच्या […]

Mumbaitak
follow google news

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजला तो भाजपने चालवलेल्या प्रारुप विधानसभेने. १२ आमदारांवर निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाबाहेर प्रतिविधानसभा चालवली. परंतू सभागृहात यावर आक्षेप घेण्यात आला. अखेरीस तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हे कामकाज थांबवण्याचे आदेश दिले. यानंतर मार्शल्सनी हे कामकाज थांबवलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

हे वाचलं का?

“लोकशाहीच्या इतिहासात आज एक काळा अध्याय लिहीला गेला आहे. आम्ही शांतपणे निदर्शनं करत होतो. मार्शल्स पाठवून आम्हाला हटवण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारच्या विरोधात आहे. हा आक्रोश आम्ही मांडत होतो तर खोटे आरोप लावून १२ आमदारांना निलंबीत करण्यात आलं. खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं काम सुरु आहे.”

Vidhan Sabha Live : विधानभवनाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा, कालिदास कोळंबकर बनले अध्यक्ष

पत्रकारांचे कॅमेरे हिसकावण्याचं काम इथे झालं विरोधी पक्ष आणि पत्रकार अशा दोन्ही स्तंभांना ठाकरे सरकार कुलूप लावणार असेल तर आम्ही प्रेस रुममध्ये अधिवेशन चालवू अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्यामुळे विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजातही चांगलाच गदारोळ पहाय़ला मिळाला.

    follow whatsapp