बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं असं म्हणत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही घणाघाती टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवर आणि आमदारांवर अन्याय केला. जो महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांनी केला तो महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान होता असंही विजय शिवतारे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे. पुरंदर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्यावरही विजय शिवतारेंनी केली टीका
राज्यातल्या सगळ्या ठिकाणी चाळीस आमदारांबाबत अपशब्द वापरले जात आहेत. मात्र पाया पडून सांगतो एकनाथ शिंदे आम्हाला ४० आमदारांना घेऊन गेले नाहीत तर आम्ही त्यांना घेऊन गेलो हे शहाजीबापू यांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपासून वेगळं व्हा अशा अनेक विनवण्या मीदेखील उद्धव ठाकरेंना केल्या होत्या मात्र त्यांनी ऐकलं नाही असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. ज्यांनी आमच्या विनवण्या ऐकल्या नाहीत ते आता आमच्या बद्दल अपशब्द वापरत आहेत आम्हाला गद्दार म्हणत आहेत असंही विजय शिवतारे त्यांच्या भाषणात म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातील सासवड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनीदेखील भाषण केलं. यावेळी त्यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमाला माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शहाजी पाटील उपस्थित होते.
सत्ता असताना मविआने पुरंदर तालुक्याला काय दिलं हो? विजय शिवतारेंचा सवाल
पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी मी मंत्री असताना मंजूर करून आणलेली गुंजवणी पाणी योजना मविआ सरकार येताच अजित पवारांनी बारामतीला पळवून नेली आणि या पुरंदरचा गाढव आमदार तोंडातून एक शब्द काढत नाही. राष्ट्रीय कृषी बाजारही पवारांनी तिकडे हवेलीला पळवला. तरीही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे का गप्प बसले? असाही प्रश्न विजय शिवतारे यांनी विचारला आहे.
बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं. वसंत दादा पाटलांचा धोका करुन खंजीप खुपसून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंत दादा पाटील यांचं सात्विक राजकारण संपवून बाजारु राजकारण आणलं अशी घणाघाती टीकाही विजय शिवतारे यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT