ADVERTISEMENT
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकताच एक नवा बंगला खरेदी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये हा आलिशान बंगला आहे. तब्बल 6 कोटी रुपये याची किंमत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा बंगला 2000 स्क्वेअर फूटचा आहे,
आता या घराचे आतील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, जे Avās Wellness ने डिझाईन केले आहेत.
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये विराट कोहली घराच्या डिझाईनबद्दल Avās Wellness सोबत बोलताना दिसत आहे. त्यात आतील फोटो दाखवण्यात आले आहेत.
विराटच्या या आलिशान बंगल्यात पूल, लिव्हिंग रूम, बेडरूम यासह इतर सर्व सुविधा आहेत.
विराट कोहलीचे दिल्लीतही घर आहे. तसंच, याआधी पत्नी अनुष्का शर्मासोबत त्याने वरळीमध्येही घर खरेदी केलं होतं.
ADVERTISEMENT