vladimir putin kremlin drone attack : रशियाच्या राष्ट्रपती भवनावर ड्रोन हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन थोडक्यात बचावले आहेत. सध्या ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. हा हल्ला युक्रेनने केल्याचा गंभीर आरोप रशियाने केला आहे. मात्र या हल्ल्यानंतर देखील 9 मे रोजी होणार विक्ट्री परेड ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.(vladimir putin in kremlin drone attack video viral russia allegation onn ukrain)
ADVERTISEMENT
रशियाने या हल्ल्यानंतर एक निवेदन जारी करत घटनेची माहिती दिली. या निवेदनात म्हटले गेले की, व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न काल रात्री ड्रोन हल्ला करून कऱण्यात आला. युक्रेनच्या या दोन्ही ड्रोनवर हल्ला करून ती पाडण्यात आली. हा हल्ला पुतिन यांच्यावर करण्यात आला होता. सुदैवाने या अपघातातून ते बचावले आहेत. ते सध्या सुखरूप आहेत. रशियाने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटलं आहे.9 मे रोजी होणाऱ्या विक्ट्री परेडपुर्वी हा हल्ला करण्यात आला होता.मात्र असे असले तरी विक्ट्री परेड ठरलेल्या दिवशीच होणार असल्याची माहिती या निवेदनातून देण्यात आली आहे.
हे ही वाचा :शारीरीक संबंध ठेवून श्रीमंतांना फासायच्या, पोलिसच हनी ट्रॅप गँगमध्ये होते सक्रिय
रशियाही ड्रोन हल्ला करणार
रूसचे राष्ट्रपती भवनचे मीडिया सचिव या हल्ल्यावर म्हणाले की,रशियाला केव्हाही आणि कुठेही आक्रमण करण्याची संधी मिळेल तेव्हा ते हिशेब चुकता करणार आहेत. हा दहशतवादी हल्ल्याचा कट होता, ज्याचा उद्देश पुतिन यांना मारण्याचा होता. रशिया युक्रेनला या ड्रोन हल्ल्याचा उत्तर द्यायला तयार आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर देखील 9 मे रोजी होणारा विक्ट्री परेड कार्यक्रम रद्द होणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
युक्रेन आरोपावर काय म्हणाला?
रशियाने युक्रेनवर केलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच युक्रेनने या हल्ल्याची कोणतीही माहिती नसल्याची माहिती दिली आहे. युक्रेनने या हल्ल्यात आपला सहभाग नाकारला आहे. तसेच क्रेमलिनवर रात्री झालेल्या या कथित हल्ल्यांबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, असे झेलेन्स्कीच्या प्रेस सेक्रेटरींनी म्हटले आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वारंवार सांगितले आहे की युक्रेन आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यास तयार आहे आणि इतरांवर हल्ले करत नाही,असेही त्यांनी म्हटले.
ADVERTISEMENT