बारामती : कालव्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

मुंबई तक

• 06:56 AM • 02 Jun 2021

बारामती तालुक्यातील शिर्सफुळ भागात शिरसाई कालव्याला जाणारी पाईपलाईन आज सकाळी ९ वाजल्याच्या दरम्यान फुटली. पाण्याच्या अतिदाबामुळे ही पाईपलाईन फुटल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं असून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचंही मोठं नुकसान झालंय. अचानक घरात पाणी शिरल्यामुळे या भागात राहणाऱ्य़ा लोकांची चांगलीच धांदल उडाली. घरातलं सर्व सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी इथले […]

Mumbaitak
follow google news

बारामती तालुक्यातील शिर्सफुळ भागात शिरसाई कालव्याला जाणारी पाईपलाईन आज सकाळी ९ वाजल्याच्या दरम्यान फुटली. पाण्याच्या अतिदाबामुळे ही पाईपलाईन फुटल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं असून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचंही मोठं नुकसान झालंय.

हे वाचलं का?

अचानक घरात पाणी शिरल्यामुळे या भागात राहणाऱ्य़ा लोकांची चांगलीच धांदल उडाली. घरातलं सर्व सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी इथले नागरिक धडपड करताना दिसले. गेल्या दोन दिवसांत या भागात पाऊस पडत होता, याच भागात आज कालव्याची पाईपलाईन फुटून पाणी शेतीत घुसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.

अनेक नागरिकांच्या शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या असून पाणी शिरल्यामुळे दुचाकी-चारचाकी गाड्यांचंही नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच पाईपलाईन दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणात नुकसान झालेल्यांना पंचनामे करुन भरपाई देण्यात येणार आहे.

    follow whatsapp