पुण्यात शनिवार आणि रविवारी Weekend Lockdown असणार आहे अशी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. शनिवार आणि रविवार पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढते आहे या गर्दीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातून बाहेर फिरायला जाणारे लोक पुण्यात परततील तेव्हा त्यांना पंधरा दिवस क्वारंटाईन केलं जाईल असंही अजित पवार यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
पुण्यात शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शनिवार आणि रविवार पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढते आहे या गर्दीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पुण्यात Weekend Lockdown ची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळ्या आस्थापना, दुकानं बंद राहणार आहेत. ग्रामीण भागांमध्येही हे नियम लागू असणार आहेत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अनेक लोक अजूनही कोरोनाची स्थिती गांभीर्याने घेतलेली नाही. पहिल्या लाटेत 60 वर्षे आणि त्यावरील वयोगटाला जास्त धोका होता. दुसऱ्या लाटेत तरूणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले. तसंच दुसऱ्या लाटेत संसर्गाचं प्रमाणही जास्त होतं. अशात अजूनही लोक गांभीर्याने कोरोनाचं प्रकरण घेत नाहीत, अकारण घराबाहेर पडत आहेत. मी पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की गरज नसेल तर मुळीच घराबाहेर पडू नका. घरातच थांबा. काही लोक पुण्याच्या बाहेर जात आहेत. त्यांना पुण्यात परतल्यावर पंधरा दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे.
मूळात एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेत शंभर टक्के व्हॅक्सिनेशन झालं आहे तरीही तिथे तिसरी लाट आली. आपल्याकडे अजून लसीकरणही तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही. तिसरी लाट आली तर तिला नियंत्रित कसं करायचं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कदाचित आमच्या तरूण पिढीला आमचा निर्णय पटणार नाही, पण लोकांच्या जिवाचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT