संजय राठोड यांच्या विरोधातली माझी लढाई सुरूच राहणार आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांनी जो कायदेशीर लढाईचा इशारा दिला त्यावर विचारलं असता मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
‘आता शांत बसणार नाही,’ संजय राठोडांनी सोडलं मौन; चित्रा वाघ यांना दिला हा इशारा!
काय म्हणाल्या आहेत चित्रा वाघ संजय राठोड यांच्याबाबत?
संजय राठोड यांची प्रतिक्रिया मी काल ऐकली. जे काही पुरावे असतील त्यांनी मला देऊ नये, न्याय व्यवस्थेला द्यावेत. त्यांना जे वाटतं आहे की मी निर्दोष आहे तर पुरावे न्यायालयाला द्यावेत. आमची लढाई जी आहे ती सुरूच आहे असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रश्न उरला इशारा देण्याचा, तर मी कोणाच्याही इशाऱ्याला घाबरत नाही, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण मृत्यू : अत्यंत दुर्दैवी; संजय राठोडांची मंत्रिमंडळात वर्णी, चित्रा वाघ भडकल्या
शिवसेनेत जाणार का? या प्रश्नावर काय म्हणाल्या चित्रा वाघ?
मनिषा कायंदे यांनी तर तुम्हाला आता शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे त्यावर काय सांगाल असं विचारलं असता चित्रा वाघ म्हणाल्या की आत्ता काही महिला नेत्या माझ्यावर तोंडसुख घेण्यासाठी आणि टीका करण्यासाठी बोलत आहेत. त्यांना पूजा चव्हाणशी काहीही घेणंदेणं नाही. पूजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला ते सगळ्यांना माहित आहे. तेव्हा या महिला नेत्या गप्प बसल्या होत्या. आत्ता ज्या रणरागिणी वल्गना करत आहेत त्यांना माझ्याविरोधात बोलण्याचा अधिकार नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड यांना क्लीन चिट महाविकास आघाडी सरकारने दिली आहे. शिंदे फडणवीस सरकारने दिलेली नाही असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. पूजा चव्हाण ही माझ्या नात्यातली मुलगी नव्हती पण ती महाराष्ट्राची लेक होती. तिला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यावरून मी माझी लढाई सुरूच ठेवणार आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
तुमच्या पाठिशी पक्ष म्हणून चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस आहेत का? हा प्रश्न विचारला असता माझ्या पाठिशी राज्यातली मातृशक्ती आहे. माझा लढा संजय राठोड यांच्या विरोधात आहे तो संपणार नाही असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते संजय राठोड?
चित्रा वाघ यांच्या आरोपावर संजय राठोड यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलताना असंच सुरु राहिलं तर आपण कायदेशीर मार्ग अवलंबनार आहे, असा इशारा दिला आहे. माझा राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रकार झाला तरी त्याला मी सामोरे गेलो. निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी बाजूला झालो. स्वतःहून राजीनामा दिला. आज त्या प्रकरणाची चौकशी झाली आहे. पोलिसांनी त्याबाबतीत राजपत्र प्रकाशित केले आहे. मी निश्कलन्क आहे, असं संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT