Satish Kaushik death investigation: अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल्यानंतर एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय, ते म्हणजे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर देणारा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आता समोर आला आहे. अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद असावा, याची पुष्टी करणारा कोणताही उल्लेख पोलिसांना पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये आढळून आलेला नाही.
ADVERTISEMENT
सतीश कौशिक यांचा मृत्यू धुळवडीच्या दिवशी झाला होता. प्राथमिक माहितीनुसार सतीश कौशिक यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. अभिनेते सतीश कौशिक हे 8 मार्च रोजी फार्महाऊसवर सर्व मित्रांसोबत होळी खेळले. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सतीश कौशिक मृत्यू : पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे शंकांचं निरसन
पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की, सतीश कौशिक यांना हायपरटेन्शन आणि मधुमेह असल्याची पार्श्वभूमी आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्याचबरोबर मधुमेहामुळेही ते त्रस्त होते.
Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सतीश कौशिक यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन चार डॉक्टरांच्या पथकाने केलं होतं. त्याचबरोबर पोस्टमॉर्टेम करतानाच्या प्रक्रियेचं चित्रीकरण आणि फोटोही काढण्यात आले आहेत.
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट : सतीश कौशिक यांच्या मृत्यूंची कारण काय?
पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सतीश कौशिक यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाला आहे. याच कारण कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज आहे, जे की कोरोनरी आर्टरी आजारी संबंधित आहे. सतीश कौशिक यांचा पोस्टमॉर्टेम रिर्पोट व्यवस्थित ठेवण्यात आला आहे.
प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा
सतीश कौशिक यांच्या ह्रदयाचे आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले असून, याचे रिपोर्ट पोलिसांनी 10 ते 15 दिवसांत मिळतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. रक्ताचे रिपोर्ट आल्यानंतर सतीश कौशिक यांच्या मृत्यूची कारणं अधिक स्पष्ट होतील, असं पोलिसांनी सांगितलं.
Satish Kaushik यांचा संशयास्पद मृत्यू?; पोलिसांना नेमकं काय सापडलं?
रात्री 12 वाजता तब्येत बिघडली, नंतर काय झालं?
होळीच्या दिवशी सतीश कौशिक हे फार्महाऊसवर होते. तिथे मित्रांसोबत पार्टी होती. त्यात 20 ते 25 मित्र सहभागी झाले होते. सतीश कौशिक यांनी होळीचं सेलिब्रेशन केलं आणि रात्री साडेनऊ वाजता झोपण्यासाठी निघून गेले. त्यानंतर रात्री 12 वाजता त्यांची तब्येत बघिडली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं त्यांनी मॅनजेरला सांगितलं. त्यानंतर मॅनेजर त्यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन गेला. तिथे सतीश कौशिक यांचा रात्री 1 वाजून 43 मिनिटांनी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT