Maharashtra Political Crises & Amruta Fadnavis Bribe case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 9 महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आज अखेर संपली आहे. या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता कोणाच्या बाजूने निकाल लागतो याकडे संपुर्ण महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. या सर्वांत मोठ्या राजकीय विषयासह अमृता फडणवीस लाच प्रकरण देखील विधानसभेत गाजले. अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर दिल्याप्रकरणी कथित डिझायनर तरुणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली आहे. वाचा काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? (What happened in Maharashtra politics? Read in detail)
ADVERTISEMENT
शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली… सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : आज पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे, शिंदे गट आणि राज्यपालांच्या बाजूने अखेरचे युक्तीवाद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3YUKnvk
Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक
Amruta Fadnavis files complaint against designer : मुंबईतील एका डिझायनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3n0dIHb
शेतकऱ्यांचा लॉंग मार्च ठाण्यात येताच CM शिंदे अॅक्शनमध्ये; मोठे निर्णय होणार?
नाशिकहून निघालेला लॉंग मार्च मुंबईच्या उंबरठ्यावर येताच राज्य सरकाराने तातडीने पावलं उचलतं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आज (गुरुवारी) दुपारी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक पार पडली.
वाचा सविस्तर : https://bit.ly/40erlRK
Maharashtra political crisis: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का?”, सरन्यायाधीशांचा सवाल
maharashtra political crisis Supreme court latest news: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या राजीनामाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. राज्यपालांनी अधिकारांचा केलेला वापर योग्य नव्हता असा निष्कर्ष आम्ही काढला तर काय होईल, प्रश्नही यावेळी सरन्यायाधीशांनी विचारला.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3JI6hxs
“मोदी आणि त्यांच्या बगलबच्च्यांना देश…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
Shiv Sena UBT Attacks On Narendr Modi And BJP : राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपने थेट त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपने केलेल्या मागणीवर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच खडेबोल सुनावले आहेत.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3z2sAYJ
ADVERTISEMENT