कोरोनावरील लस घेतल्याने नेमकं काय होतं? जाणून घ्या सरळसोप्या भाषेत

मुंबई तक

• 02:50 PM • 12 Apr 2021

डॉ. रवी गोडसे, पेनसिल्व्हेनिया कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरी कोरोना होतो असं म्हणत अनेक जण शंका घेतात. पण कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने केवढा मोठा बदल होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर काही गोष्टी आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोरोनावरील लस घेतल्यानंतर देखील इतरांना कोरोनाबाधित करु शकता का? हे पाहा भारतात ज्या […]

Mumbaitak
follow google news

डॉ. रवी गोडसे, पेनसिल्व्हेनिया

हे वाचलं का?

कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरी कोरोना होतो असं म्हणत अनेक जण शंका घेतात. पण कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने केवढा मोठा बदल होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर काही गोष्टी आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे.

तुम्ही कोरोनावरील लस घेतल्यानंतर देखील इतरांना कोरोनाबाधित करु शकता का?

हे पाहा भारतात ज्या दोन लसी आहेत कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड किंवा अमेरिकेत ज्या तीन आहेत त्याच्यापैकी कोणतीही लस ही लाइव्ह व्हायरस वॅक्सिन नाही. लाइव्ह व्हायरस वॅक्सिन असेल तर तुम्ही घेतलेली लस ही तुम्ही इतरांमध्ये पसरवू शकता. जसं आजार पसरतो तसं तुम्ही लस पसरवू शकता. पण याच्यापैकी कोणतीही लस ही लाइव्ह नाहीए. मेलेल्या आहेत किंवा एमआरएनए पार्टिकल्स आहेत. त्यामुळे तुम्ही इतरांना कोरोनाबाधित करण्याआधी सर्वात पहिले तुम्हाला कोरोना झालेला असला पाहिजे. तरच तुम्ही इतरांना बाधित करु शकता.

आता तुम्ही लस घेतलीय त्यामुळे तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल का?

नाही… त्रिवार नाही. तुम्ही लस घेतली त्याच्यामुळे तुम्हाला कोरोना होईल का? नाही… फार तर तुम्ही असं म्हणू शकता की, लसीचा परिणाम कमी पडला. मी लस घेतली तरी कोरोना झाला. पण तुम्हाला कोरोना झाल्याशिवाय तुम्ही इतरांना बाधित करु शकत नाहीत.

‘अवघ्या 10 दिवसात कोरोनाची दुसरी लाट आपल्याला रोखता येईल’

समजा लस घेतली आणि तुमचं संरक्षण झालं तर तुम्ही इतरांचं पण म्हणजे तुमच्या शेजारच्यांचं पण संरक्षण करु शकाल का?

लसीमुळे तुमचं संरक्षण होत असेल तर… याचं जर उत्तर होय असेल तर साथीचा रोग संपला… नाही असेल तर थोडा प्रॉब्लेम आहे. माझं उत्तर आहे होय आणि नाही.. म्हणजे तुम्ही शेजाऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करतायेत. प्रत्यक्ष मदत कशी करताय की, जसं तुम्ही मास्क घातल्यावर इतरांचं संरक्षण होतं आणि तुमचं थोडं संरक्षण होतं. तसं तुम्ही लस घेतल्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होणार नाही. जेव्हा शास्त्रज्ञांनी लस तयार केली तेव्हा त्याचा हेतू हाच होता की प्रत्येक रुग्णाचं संरक्षण व्हावं. त्याला न्यूमोनिया किंवा गंभीर आजार होऊ नये. तेव्हा हा विचार आला नाही की, एसीम्प्टोमेटिक ट्रान्समिशन थांबावं. पण गंमत म्हणजे कोव्हिशिल्डमध्ये जवळजवळ 70 टक्के एसीम्प्टोमेटिक ट्रान्समिशन देखील थांबतंय. त्याच्यामुळे तुमच्या शेजारी जे राहतायेत त्यांचं तुम्ही प्रत्यक्ष संरक्षण करतायेत तुम्ही लस घेऊन.

अप्रत्यक्ष संरक्षण कसं आहे माहितीए का.. समजा तुमचा 100 जणांचा एक ग्रुप आहे त्यापैकी एखाद्याला कोरोनाची लागण कुणाकडून होणार आहे तर या संपूर्ण ग्रुपपैकी एखाद्याकडूनच होणार आहे ना. त्यामुळे या सगळ्या लोकांनी जर लस घेतली असेल तर तुम्हाला जो कोरोना बाधित करणार होता तो 100 ऐवजी अचानक 45 वर येऊन पोहचला ना. कारण 55 टक्के लोकांचं संरक्षणं झालं आहे.

पण तुम्ही म्हणाला की कोरोना लस घेऊन देखील कोरोना होतोच कसा?

कोव्हिशिल्डचे दोन डोसेस घेतल्यानंतर चार आठवड्यानंतर 55 टक्के कार्यक्षमता आहे. त्यामुळे लस घेऊन दोन-तीन आठवड्यानंतर तुम्ही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात तर तुम्हाला 45 टक्के कोरोना होण्याची शक्यता आहे. माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे. अगदी मी सोप्या शब्दात सांगतो की, आता जे काही कोरोना रुग्णांचे आकडे समोर येतायेत, आपल्याला माहिती आहे की, लस घेतल्यानंतरही काही जणांना लागण होते आहे. माझा प्रश्न हा की, जे लोकं रुग्णालयात जातायेत, ज्यांना न्यूमोनिया होतो आहे का, व्हेंटिलेटरवर जातायेत त्यांनी लस घेतली होती का?

लस घेतलेल्या लोकांना कोरोना होतो आहे का, म्हणजे गंभीर कोरोना होतो आहे का?

याचं उत्तर होय असेल तर मग काही तरी थोडा वेगळा विचार करावा लागेल. याचं उत्तर नाही असेल.. म्हणजे एक डोस घेऊन गंभीर कोरोना होत नाही असं उत्तर असेल तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, साथीचा रोग संपल्यानंतर जो आंनदोत्सव करायचा आहे त्याच्या तयारीला लागा. तुम्ही म्हणाल काय यार इथे बेड मिळत नाही, हॉस्पिटल मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. विश्वास ठेवा कोट्यवधी लोकांचं लसीकरण झालं नसतं तर आता हाहाकार उडाला असता. म्हणजे सगळं कोलमडून पडलं असतं. म्हणून माझ्या डॉक्टर मित्रांना एकच विनंती आहे की, कोव्हिशिल्डचे दोन डोस घेऊन झाल्यानंतर देखील कोरोना झाला ही बातमी नाही. त्याच्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. त्यामुळे तशा पोस्ट टाकू नका. कारण अशा पोस्टमुळे जर 100 लोकांनी लस घेतली नाही. तर आणखी कोरोना पसरत राहिल.

Exclusive : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही – डॉ. रमण गंगाखेडकर

मी माझ्या ट्विटर अकाउंटवर बरेच ट्विट करत असतो त्यातील माझं एक असं ट्विट आहे की, बातमी काय पाहिजे मला कोरोना झाला होता पण मी कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यामुळे मी वाचलो. मला गंभीर कोरोना झाला नाही. पण बातमी काय असते की, दोन्ही डोस घेतले तरी मला कोरोना झाला. त्यामुळे लोकं अजून निराश होतात. ज्याच्या जवळची व्यक्ती दगावली आहे त्यांना मी कोणत्या तोडांने सांगू की, जास्त सीरियसली घेऊ नका म्हणून.. पण जास्त दु:खात राहू नका.. अडकून पडू नका…

शेवटी एकच सांगतो..

आली जरी कष्ट दशा अपार

न टाकिती धैर्य तथापि थोर

केला जरी पोत बळेची खाले

ज्वाला तरी ते वरती उफाळे

(रवी गोडसे हे पेशाने स्वत: डॉक्टर आहेत. पण याशिवाय ते सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक देखील आहेत. तसंच कोरोना आणि त्याच्याशी संबंधित बऱ्याच गोष्टींवर त्यांचा सविस्तर अभ्यास देखील आहे.)

    follow whatsapp