Lord Rama and Shaligram: अयोध्या: उत्तर प्रदेशातील (Uttar Pardesh) अयोध्येत राम मंदिराचे (Ram Mandir) काम हे वेगाने सुरू आहे. याच मंदिरात बसविण्यात येणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अयोध्येतील (Ayodhya) या भव्य मंदिरात प्रभू रामाची मूर्ती (Idol of Lord Rama) ही शाळीग्राम दगडाची (Shaligram) असेल. हे शाळीग्राम दगड नेपाळच्या (Nepal) गंडकी नदीतून आणले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा दगड दोन तुकड्यांमध्ये असून या दोन दगडांचे एकूण वजन 127 क्विंटल आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत या शिळा अयोध्येत आणल्या जातील. (what is shaligram rock from which idol of ram sita will be made know its religious importance)
ADVERTISEMENT
अयोध्येत रामजन्मभूमीचे काम वेगाने सुरू आहे. जानेवारी 2024 पर्यंत रामजन्मभूमीचा तळमजला तयार होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे दगड आता नेपाळमधील जनकपूर येथे आणण्यात आले आहेत. जनकपूरच्या मुख्य मंदिरात याची पूजा करण्यात आली. विशेष पूजेनंतर या शिळा भारतात आणले जात आहे. आज (31 जानेवारी) या शिळा गोरखपूरमध्ये पोहचल्या आहेत.
राम मंदिर जमीन घोटाळा : हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं – संजय राऊत
मूर्ती घडविण्यासाठी शाळीग्राम दगडांचीच का केली निवड?
शास्त्र मान्यतेनुसार शाळीग्राममध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे म्हटले जाते. माता तुळशी आणि भगवान शाळीग्राम यांचाही पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे या शिळा अतिशय खास मानल्या जातात. लोकांच्या म्हणण्यानुसार या दगडांना धार्मिक महत्त्व आहे. कारण ते भगवान विष्णूशी संबंधित आहेत.
या दगडांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दगड बहुतेक गंडकी नदीतच आढळतात. हिमालयातून वाहणारं पाणी हे तेथील खडकांचे तुकडे करतं हेच दगड नंतर गंडकी नदीत आढळतात. त्यामुळे नेपाळमधील लोक हे दगड शोधून त्यांची पूजा करतात.
मान्यतेनुसार शाळीग्रामचे 33 प्रकार आहेत. शाळीग्राम दगड भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित आहे. असेही मानले जाते की, ज्या घरात शाळीग्राम दगड असतो त्या घरात सुख-शांती नांदते आणि परस्पर प्रेम टिकून राहते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही कायम असते.
तज्ज्ञ पाहणार गंडकी नदीतील शाळीग्राम खडक
शाळीग्राम खडकाला विशेष महत्त्व आहे. पण, तांत्रिक तज्ज्ञांचे पॅनेल हे या खडकांचं परीक्षण करुन ते भव्य मूर्ती घडविण्यास किती अनुकूल आहे यावर सविस्तर मंथन करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामथ यांच्याशिवाय पद्मभूषण शिल्पकार राम वनजी सुतार यांना प्रभू रामाची मूर्ती बनवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राम सुतार यांनीच स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचनाही केली आहे. अलीकडेच अयोध्येत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून वीणा बसवण्यात आली आहे. ती वीणा राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल राम सुतार यांनी तयार केली आहे.
Big News : अयोध्येतील प्रभू राम मंदिर 2023 मध्ये भक्तांसाठी खुलं होणार
दुसरीकडे, चित्रकार वासुदेव कामथ, ज्यांच्याकडे मूर्ती घडवण्याच्या पहिल्या टप्प्याची जबाबदारी आहे, ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार असून त्यांची रेखाटन आणि चित्रे बनवण्यात विशेष कीर्ती आहे. याशिवाय मूर्तीकार पद्मविभूषण सुदर्शन साहू, पुरातत्व शास्त्रज्ञ मनैय्या वाडीगर, तांत्रिक तज्ज्ञ आणि मंदिर बांधणारे वास्तूविशारदही मूर्ती निश्चित करण्यात भूमिका बजावणार आहेत. प्रभू रामाची मूर्ती अशी असेल की, ज्याचा मंदिराच्या स्थापत्यकलेशी समन्वय असेल. रामललाची मूर्ती ही 5 ते साडेपाच फूट बालस्वरूपाची असेल. रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट मूर्तीच्या कपाळावर पडतील अशा पद्धतीने मूर्तीची उंची निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT